शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्सची कंपनी देणार मेट्रो रेल्वेसाठी कर्ज

By admin | Updated: December 3, 2014 00:42 IST

मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी लागणारे तब्बल ४ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज लवकरच उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. फ्रान्स येथील ‘फ्रेन्च डेव्हलपमेंट एजन्सी’ने यासाठी सकारात्मक संकेत दिले आहेत.

४५०० कोटींचे कर्ज अपेक्षित : फे्रंच चमूने केली रुटची पाहणी कमलेश वानखेडे - नागपूरमेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी लागणारे तब्बल ४ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज लवकरच उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. फ्रान्स येथील ‘फ्रेन्च डेव्हलपमेंट एजन्सी’ने यासाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. संबंधित एजन्सीच्या अधिकाऱ्यांच्या चमूने नागपुरात येत मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित मार्गाची पाहणी केली. आता तीन आठवड्यात कर्जपुरवठ्याबाबतचा अंतिम निर्णय कळविणार आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्प साकारण्यासाठी ८ हजार ६८० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे नागपुरात भूमिपूजनही झाले. या प्रकल्पासाठी एक एसपीव्ही (स्पेशल परपज व्हेईकल) स्थापन केली जाणार आहे. यात केंद्र सरकार, राज्य सरकार, नासुप्र व महापालिकेचे प्रतिनिधी असतील. या एसपीव्हीला प्रकल्पासाठी तब्बल ४ हजार ५०० कोटी रुपये कर्जरुपात उभारायचे आहेत. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने या प्रकल्पाला अर्थसाहाय्य मिळण्यासाठी जागतिक बँकांची मदत घेण्यास संमती दिली आहे. संबंधित विभागानाच्या सूचनेनुसार नागपूर मेट्रोला कर्जपुरवठा करता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी फ्रान्स येथील ‘फे्रन्च डेव्हलपमेंट एजन्सी’ ची तीन सदस्यीय चमू सोमवारी नागपुरात आली. या चमूत एजन्सीचे दक्षिण आशिया विभागीय संचालक आॅडे फ्लॉग्नी, प्रिस्कल दि कोनिक व जुलिएट पॅनर्स यांचा समावेश होता. नासुप्र सभापती हर्षदीप कांबळे या चमूसमोर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे प्रेझेंटेशन केले. या वेळी नागपूर शहराचे ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व, औद्योगिक केंद्र, शैक्षणिक केंद्र आदी बाबतीत माहिती दिली. सोबत नागपूर भारताच्या केंद्रीय स्थानी असल्यामुळे येथे भविष्यात मोठा लॉजिस्टिक हब होऊ शकतो, महत्त्व विषद केले. यानंतर कांबळे यांच्यासह फे्रेन्च चमूने मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित मार्गांची पाहणी केली. मिहान व हिंगणा येथे उभारण्यात येणाऱ्या मेट्रो डेपोची पाहणी केली. यावेळी मिहानमध्ये सुरू असलेली विकास कामेही दाखविण्यात आली. सायंकाळी या चमूने शहरातील वास्तविक वाहतुकीचीही पाहणी केली. भूसंपादनाच्या अडचणी नाही मेट्रो रेल्वे प्रकल्पात सर्वात मोठा अडथळा जागेचा असतो. कोणत्याही शहरात मेट्रोचा मार्ग निश्चित केल्यानंतर या मार्गात येणाऱ्या इमारती, भूखंडांचे अधिग्रहण करावे लागते. मात्र, नागपुरात मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित मार्गात ७ ते ८ ठिकाणीच खासगी इमारती व भूखंड अधिग्रहित करावे लागणार आहेत. उर्वरित इमारती व भूखंड हे नासुप्र, महापालिका किंवा शासनाच्या मालकीचे आहेत. त्यामुळे भूसंपादनात फारशी अडचण येणार नाही व त्यासाठी प्रकल्पाचे काम रखडणार नाही, असे कांबळे यांनी फे्रन्च चमूला आश्वस्त केले.