शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तिघांना जीवनदान

By admin | Updated: February 26, 2015 02:33 IST

अवयव निकामी झाल्याने अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता अनेक रुग्णांना भासते. पण अवयवदानाचे प्रमाण कमी

मुंबई : अवयव निकामी झाल्याने अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता अनेक रुग्णांना भासते. पण अवयवदानाचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक रुग्णांना अवयव मिळत नाहीत. २०१५ मध्ये या चित्रात काही प्रमाणात बदल होण्याची सकारात्मक चिन्हे दिसत आहेत. कारण २३ फेब्रुवारी रोजी या वर्षातले सहावे कॅडेव्हर डोनेशन झाले. २३ फेब्रुवारीला डोंबिवली येथे राहणाऱ्या ६६ वर्षीय जयंतीलाल भानुशाली यांचे यकृत, किडनी आणि डोळे दान केल्यामुळे तीन जणांना जीवनदान मिळाले आहे. जयंतीलाल भानुशाली यांना वाशीच्या एका रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान झाले. यानंतर त्यांना पुढच्या उपचारासाठी ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले. या रुग्णालयातील काही तपासण्यानंतर जयंतीलाल ब्रेनडेड झाल्याचे घोषित करण्यात आले. हे सर्व अचानकच घडले. याआधी अवयवदानाविषयी आम्ही कधी विचार केला नव्हता. पण, भानुशाली यांना ब्रेनडेड घोषित केल्यावर डॉक्टरांनी अवयवदानाविषयी सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांचे यकृत, किडनी आणि डोळे दान करण्याचा निर्णय घेतला, असे पुतण्या नीलेश भानुशाली यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गेल्या काही वर्षांपेक्षा २०१५ च्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत कॅडेव्हर डोनेशन झाली आहेत. (प्रतिनिधी)