शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅम्पा कोला’ला थोडा दिलासा

By admin | Updated: May 31, 2014 05:27 IST

१४० फ्लॅट असलेले ३५ अनधिकृत मजले वाचवण्यासाठी कॅम्पा कोला रहिवाशांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे़

मुंबई : १४० फ्लॅट असलेले ३५ अनधिकृत मजले वाचवण्यासाठी कॅम्पा कोला रहिवाशांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे़ विशेष म्हणजे न्यायालयाने यावरील कारवाईच्या आधीच्या आदेशाला स्थगिती न देता येथील रहिवाशांचे म्हणणे मंगळवारी ऐकणार असल्याचे स्पष्ट केले आहे़ याने या अनधिकृत मजल्यांवर राहणार्‍या कुटुंबांना थोडासा दिलासा मिळाला असून त्यांचे भवितव्य मंगळवारच्या सुनावणीवर निर्भर आहे़ महत्त्वाचे म्हणजे या रहिवाशांनी नवीन केलेल्या याचिकेत माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेल्या काही माहितीचा आधार घेत हे मजले अधिकृत करण्याचा दावा केला आहे़ १९८५-८६ मध्ये राज्य शासन व महापालिकेने अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याचा निर्णय घेतला होता़ त्यामुळे हे मजले अधिकृत करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत व तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये़ तसेच या नवीन मुद्यांंची सुनावणी घेण्यासाठी हे प्रकरण पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करावे, अशी मागणी रहिवाशांनी याचिकेत केली आहे़ सुटीकालीन न्या़ जे़एस़ खेहर व न्या़ सी़ नागपन्न यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले़ मात्र, या सोसायटीच्या अनधिकृत मजल्यांवर कारवाई करण्याच्या आधीच्या याच न्यायालयाच्या आदेशाला खंडपीठाने स्थगिती दिली नाही़ गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने या सोसायटीच्या अनधिकृत मजल्यांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा केला़ त्यानंतर, या सोसायटीने हे मजले वाचवण्यासाठी राजकीय पाठबळापासून न्यायालयीन तरतुदींचे अनेक पर्याय अवलंबले़ मात्र, ५ मे २०१४ रोजी न्यायालयाने हे मजले तोडण्याचे आदेश कायम ठेवत येथील रहिवाशांना ३१ मेपर्यंतची मुदत दिली़ त्याआधीच सोसायटीने नवीन मुद्दा घेत सर्वोच्च न्यायालयात पुन्हा धाव घेतली आहे़