शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

यादीत नावच नाही, अर्ज कसा भरता?

By admin | Updated: September 8, 2015 01:14 IST

आजीव सभासदांच्या यादीत तुमचे नाव नाही, त्यामुळे तुम्हाला अर्ज भरता येणार नाही, असे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यास गेलेल्या शरणकुमार लिंबाळे

पुणे : आजीव सभासदांच्या यादीत तुमचे नाव नाही, त्यामुळे तुम्हाला अर्ज भरता येणार नाही, असे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यास गेलेल्या शरणकुमार लिंबाळे यांना साहित्य परिषदेकडून सांगण्यात आले. मात्र पैसे भरल्याची पावती सादर केल्यावर त्यांचा अर्ज स्वीकारला गेला.पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. लिंबाळे हे समर्थकांसह अर्ज भरण्यासाठी गेले असता ते परिषदेचे आजीव सभासद आहेत, अशी कोणतीही नोंद साहित्य परिषदेकडे नव्हती. त्यामुळे तुम्हाला अर्ज भरता येणार नाही, असे सुनविण्यात आले. तुम्हाला साहित्य पत्रिकेचा अंक येतो का, कार्यक्रमांची निमंत्रणे येतात का, असेही प्रश्न विचारण्यात आले. लिंबाळे यांनी आजीव सभासदत्वासाठी भरलेल्या पैशांची पावती घरी शोधून काढली आणि ती व्हॉटस्अ‍ॅपद्वारे परिषदेला पाठविली. त्यानंतर त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला. यासंदर्भात लिंबाळे यांच्याकडे विचारणा केली असता २००७मध्ये परिषदेचे आजीव सभासदत्व घेतले असल्याचे ते म्हणाले. नोंदी ठेवण्यात परिषदेकडून चूक झाली असेल, असेही ते म्हणाले. अरुण जाखडे यांच्या उमेदवारी अर्जावर श्रीधर माडगूळकर यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यांच्याबाबतची माहिती जाखडे अर्ज भरत असताना उपलब्ध झाली नाही. तेही सभासद नसल्याचे सांगण्यात आले. तीन वर्षांपूर्वी माडगूळकर यांनी परिषदेच्या याच पदाधिकाऱ्यांकडे सदस्यत्वासाठी अर्ज भरला आहे. यापैकी काही पदाधिकाऱ्यांच्या त्यांच्या अर्जावर सह्यादेखील आहेत. पण ती माहिती ऐनवेळी उपलब्ध झाली नाही. दोन वर्षांपूर्वी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदारांच्या यादीत त्यांचे नाव होते, पण मतपत्रिका त्या वेळी मिळाली नसल्याचे माडगूळकर म्हणाले.विठ्ठल वाघ यांचा दुसरा अर्ज- ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेकडून अर्ज भरला होता, पण तांत्रिक अडचणींमुळे तो अर्ज बाद होऊ शकतो, हे लक्षात आल्याने पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून दुसरा अर्ज भरून घेतल्याचे समजले. यासंदर्भात वाघ यांच्याशी संपर्क साधला असता, तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून अन्य ठिकाणाहून अर्ज भरल्याचे ते म्हणाले.