शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ग्रंथालयेच पुस्तकांच्या प्रतीक्षेत !

By admin | Updated: June 17, 2015 01:44 IST

१२ हजार ग्रंथालयांच्या अनुदानाचे भिजत घोंगडे ; ग्रंथालयीन कर्मचा-यांवर उपासमारी.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा) : सार्वजनीक ग्रंथालयांना वर्षाकाठी मिळणार्‍या अनुदानातून ५0 टक्के रक्कम ही पुस्तक व इतर साहित्यांसाठी खर्च करावी लागते. परंतू, राज्यातील सुमारे १२ हजार ३७८ सार्वजनीक ग्रंथालयांना वर्षभरापासून अनुदानच मिळाले नसल्याने राज्यभरातील ग्रंथालयेच नविन पुस्तकांच्या प्रतीक्षेत आहेत. सार्वजनीक ग्रंथालयांच्या अनुदाचे भिजत घोंगडे राहत असल्याने हजारो ग्रंथालयीन कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने वाचन संस्कृतीची जोपासना वाढवावी हा हेतू समोर ठेऊन 'गाव तिथे ग्रंथालय' ही संकल्पना राबविली आहे. राज्यात अ,ब,क,ड श्रेणी दर्जाचे सुमारे १२ हजार ३७८ सार्वजनीक ग्रंथालये आहेत. अमरावती विभागामध्ये १ हजार ८१0 सार्वजनिक ग्रंथालये आहेत. 'अ' दर्जा असलेल्या ग्रंथालयांना वार्षिक २ लाख ८८ हजार रुपये अनुदान देण्यात येते. 'ब' दर्जा असलेल्या ग्रंथालयांना वार्षिक १ लाख ९२ हजार, 'क' दर्जा असलेल्या ग्रंथालयांना ९६ हजार रुपये अनुदान वर्षाकाठी देण्यात येते. तर 'ड' दर्जा असलेल्या ग्रंथालयांना ३0 हजार रुपये अनुदान देण्यात येते. वर्षाकाठी मिळणार्‍या या अनुदानातूनच ग्रंथालयातील सर्व खर्च भागवावा लागतो. त्यामध्ये ५0 टक्के रक्कम नवीन पुस्तकांच्या खरेदीसाठी व इतर साहित्यांसाठी खर्च करावी लागते. तर इतर ५0 टक्के रक्कम ही ग्रंथालयीन कर्मचार्‍यांच्या पगारासाठी वापरावी लागते. गेल्या वर्षभरापासून ग्रंथालयांना अनुदानच मिळाले नाही. सन २0१४-१५ चे दुसर्‍या टप्प्याचे अनुदान मार्च २0१५ चे अगोदर मिळणे आवश्यक होते. अनुदान नसल्याने नवीन पुस्तके, कर्मचार्‍यांचे पगार रखडले आहेत. यासंदर्भात जिल्हा ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष रफीक कुरेशी यांनी अद्यापपर्यंत ग्रंथालयांना अनुदान मिळाले नाही. यामुळे नवीन पुस्तके खरेदी करण्यासाठी निधी नाही. ग्रंथालयीन कर्मचार्‍यांचे पगारही रखडले असल्याचे स्पष्ट केले. *राज्य ग्रंथालय संघटनेचे दुर्लक्षवित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांच्या ग्रंथालयावरचे गं्रथपाल अनिल बोरगमवार यांच्याकडे राज्य ग्रंथालय संघटनेचे अध्यक्षपद आहे. यामुळे ग्रंथालयांच्या समस्या मार्गी लागतील, अशी आशा होती. बोरगमवार यांनी अनुदान मिळवून देण्याचे आश्‍वासनही दिले होते. आता मात्र संघटनेचे याकडे दुर्लक्ष होत असून सर्वत्र नाराजी आहे.