राजकारण न करता दुष्काळावर मात करु - शरद पवार

By Admin | Updated: September 4, 2015 19:00 IST2015-09-04T17:18:55+5:302015-09-04T19:00:36+5:30

राज्यात अशा प्रकारची दुष्काळी परिस्थिती आपण पहिल्यांदा अनुभवत आहोत.त्यामुळे या दुष्काळाच्या संकटावर कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सर्वांनी मिळून मात करुया

Let's overcome the drought without politics - Sharad Pawar | राजकारण न करता दुष्काळावर मात करु - शरद पवार

राजकारण न करता दुष्काळावर मात करु - शरद पवार

>ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. ४ - राज्यात अशा प्रकारची दुष्काळी परिस्थिती आपण पहिल्यांदा अनुभवत आहोत.त्यामुळे या दुष्काळाच्या संकटावर कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सर्वांनी मिळून मात करुया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले आहे.
सातारा जिल्हयातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी दौ-यावर आलेल्या खा. शरद पवार यांनी येथील खटाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, १९७२ साली असा दुष्काळ राज्याने अनुभवला होत्या. त्यानंतर आता अशी परिस्थिती निर्माण झाली असून या संकटावर सर्वांनी मिळून कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सामोरे गेले पाहिजेत. या ठिकाणी चारा छावण्या उभारण्यासाठी आणि योग्यरित्या पाण्याचा साठा करण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक सहाय्य करण्याची गरज असल्याचेही खा. शरद पवार यांनी सांगितले. तसेच, राज्यात परतीचा पाऊस पडेल अशी आशाही करुयात असेही यावेळी ते म्हणाले. 

Web Title: Let's overcome the drought without politics - Sharad Pawar