Summer Vacation: चला सुट्टी झाली! उन्हाचा कडाका वाढल्याने आजपासून राज्यातील शाळांना सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 06:54 IST2023-04-21T06:54:18+5:302023-04-21T06:54:42+5:30
Summer Vacation:राज्यातील उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना २१ एप्रिलपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी केली.

Summer Vacation: चला सुट्टी झाली! उन्हाचा कडाका वाढल्याने आजपासून राज्यातील शाळांना सुट्टी
मुंबई : राज्यातील उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना २१ एप्रिलपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी केली. उन्हाचा कडाका वाढत असल्याने ९ दिवस अगोदरच शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
सीबीएसई, आयसीएसईसह इतर बोर्डाच्या शाळा सुरू असल्यास शाळा प्रशासनाने यासंदर्भात उचित निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. विदर्भ वगळता सर्व शाळा १५ जूनपासून तर विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू होतील असेही ते म्हणाले. या संदर्भात दीपक केसरकर यांनी अहवाल मागविला हाेता. राज्यात काही दिवसांपासून तापमान वाढ झाल्याने काळजी घेण्यात येत आहे.