शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा सुखी होऊ दे!

By admin | Updated: July 28, 2015 04:25 IST

‘राज्यात चांगला पाऊस पडू दे, आमचा शेतकरी, सामान्य माणूस सुखी होऊ दे, सर्वसामन्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याची शक्ती आम्हाला दे, असे साकडे पंढरीनाथाला घातले

- सचिन कांबळे,  पंढरपूर‘राज्यात चांगला पाऊस पडू दे, आमचा शेतकरी, सामान्य माणूस सुखी होऊ दे, सर्वसामन्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याची शक्ती आम्हाला दे, असे साकडे पंढरीनाथाला घातले असून, ते निश्चित पूर्ण होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.आषाढीच्या महासोहळ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता यांनी केली. या पूजेनंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, मागील काही दिवसांत पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. जरी दुष्काळाची परिस्थिती आलीच तर, आमचे सरकार तयारीत आहे. या वेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने उपस्थित होते. १६ वर्षांपासून वारी राघोजी धांडे हे गेल्या १६ वर्षांपासून पायी यात्रा करतात. आम्हाला विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्याचा मान मिळेल, असे वाटले नव्हते. मुख्यमंत्र्यांबरोबर शासकीय पूजेचा मान मिळाल्याचे सांगताच आम्हाला फारच आनंद झाल्याचे राघोजी धांडे यांनी सांगितले.हिंगोलीच्या दाम्पत्याला पूजेचा मानमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा करण्याचा मान ‘मानाचे वारकरी’ म्हणून संगीता व राघोजी नारायण धांडे (पिंपरी खुर्द, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) या दाम्पत्याला मिळाला. या वेळी देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता यांनी मानाच्या वारकऱ्यांना एसटी बसचा वर्षभराचा मोफत पास देऊन सत्कार केला.दुष्काळी लढ्यासाठी सज्ज महाराष्ट्रातील अनेक यात्रेकरू अमरनाथ यात्रेमध्ये अडकले आहेत. या यात्रेकरूंची माहिती घेण्यासाठी राज्यातून दिल्लीला दोन अधिकारी पाठविले आहेत. ते माहिती घेऊन यात्रेकरूंना सुखरूप घरी पोहोचवतील. राज्यात दुष्काळ निर्माण झाल्यास त्यासाठी सरकारने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. कृत्रिम पावसाची तयारी -कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारची सर्व यंत्रणा सज्ज आहे. यासाठी विमान आले आहे. औरंगाबादमध्ये संभाजीनगरला रडार व इतर सर्व यंत्रणा कार्यरत आहे. दोन-तीन दिवसांत पाऊस न झाल्यास, हवामान खात्याकडून सूचना घेऊन कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.