शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

१६ जिल्ह्यांत राबविणार कुष्ठरोग शोध अभियान

By admin | Updated: September 17, 2016 03:53 IST

राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये १० हजार १०३ कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांमध्ये १९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत त्वचारोग व कुष्ठरोग शोधअभियान राबविण्यात येणार

मुंबई/ वर्धा : राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये १० हजार १०३ कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांमध्ये १९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत त्वचारोग व कुष्ठरोग शोधअभियान राबविण्यात येणार आहे.कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, ठाणे, रायगड व पालघर या १६ जिल्ह्यांत हे अभियान राबविले जाईल. या अभियानामध्ये १६९ तालुके, १४ महानगरपालिका व ८८ नगरपालिकांचा समावेश आहे. ‘झीरो लेप्रसी मोहीम’ यशस्वी करू, असा विश्वास आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनीव्यक्त केला.
डॉ. सावंत म्हणाले, या अभियानाअंतर्गत समाजातील संशयित कुष्ठरुग्ण शोधण्यात येतील. निश्चित निदान झालेल्या रुग्णांना तातडीने औषधोपचार सुरू करणे, हा अभियानाचा उद्देश आहे. भारतातील १३ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशातील एकूण १६३ जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.
राज्यात चालू आर्थिक वर्षांत सर्वाधिक रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात असल्याचे दिसून आले. या जिल्ह्यात ५२२ रुग्ण आढळले आहेत.
ठाणे, रायगड, पालघर तसेच मालेगाव येथे पल्सपोलिओ कार्यक्रम असल्याने तेथे १३ आॅक्टोबरपर्यंत अभियानातर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी एकूण ४ कोटी ९८ लाख लोकसंख्येचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी १ कोटी ५३ लाख शहरी भागातील व ३ कोटी ४५ लाख ग्रामीण भागातील लोकसंख्येचे उद्दिष्ट आहे.

कुष्ठरुग्णांची संख्या
जिल्हा रुग्णसंख्या प्रमाण
गडचिरोली५२२४.५२
चंद्रपूर८४८३.५९
भंडारा३९३ ३.०४
पालघर७२७२.९७
धुळे ४८१२.१८
गोंदिया२७११.९
नंदूरबार३३५१.८९
रायगड४३११.५२
जळगाव६५९१.४५
वर्धा२०३१.४५
अमरावती३३०१.०६
नागपूर४६१०.९२
यवतमाळ२५४ ०.८५
नाशिक५०५ ०.७७
वाशिम९८०.७६
ठाणे५८४०.६४