शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी दिव्यांनी उजळणार उपराजधानी

By admin | Updated: February 5, 2015 01:06 IST

उपराजधानीतील रस्ते आता एलईडी दिव्यांनी उजळणार आहेत. हायमास्ट दिव्यांची जागा आता एलईडी दिवे घेणार आहेत. असे २७ हजार दिवे लावले जातील. या कामास सुरुवातही झाली आहे.

ऊर्जा व खर्चाची बचत : २७ हजार दिवे लागणारनागपूर : उपराजधानीतील रस्ते आता एलईडी दिव्यांनी उजळणार आहेत. हायमास्ट दिव्यांची जागा आता एलईडी दिवे घेणार आहेत. असे २७ हजार दिवे लावले जातील. या कामास सुरुवातही झाली आहे. संविधान चौकात रात्रीच्या वेळी एलईडी दिव्यांचा पांढरा शुभ्र झगमगाट अनुभवायला मिळत असून लवकरच संपूर्ण नागपूर शहरात असे चित्र पहायला मिळणार आहे. राज्यात एलईडी दिवे लावणारी नागपूर महापालिका ही एकमेव ठरणार आहे.वीज बचतीसाठी एलईडी दिवे वापरा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. नागपूर महापालिकेने याची त्वरित अंमलबजावणी केल्याचे दिसत आहे. सध्या फिलिप्स कंपनीचे १०० वॉटचे दिवे लावण्यात आले आहेत. हे दिवे लावण्याचे काम जे.के. सोल्युशन या कंपनीला देण्यात आले आहे. यासाठी मनपाला कोणत्याही स्वरूपाची आर्थिक गुंतवणूक करावी लागणार नाही. शहरातील रस्त्यांवर सव्वालाख हायमास्ट दिवे आहेत. या दिव्याची जागा एलईडी दिवे घेणार आहेत. या दिव्यांचे दोन टप्प्यात डिमींग करण्याचे नियंत्रणही केले जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचत होणार आहे. यातून ६० ते ७० टक्के ऊर्जा बचत होण्याची अपेक्षा आहे. यामुळे महापालिकेच्या वीज बिलातही बरीच कपात होऊन महापालिकेची आर्थिक बचतही होईल. (प्रतिनिधी)कंत्राटदार करणार ४३ कोटींचा खर्चया प्रकल्पावर ४३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा सर्व खर्च कंत्राटदार कंपनीच करेल. पुढील १३ वर्षे कंपनी यावरील ९० टक्के खर्च करणार असून महापालिकेला केवळ १० टक्के खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेवर आर्थिक भार पडणार नाही. या दिव्याचे रिमोट कंट्रोलिंग व मॉनिटरिंग महापालिकेकडे राहील. ४ जी साठी खांबावरून केबलशहरात ४ जी साठी शहरात २३० मोबाईल टॉवर उभारले जाणार आहे. आजवर ६० टॉवर उभारण्यात आले आहेत. संबंधित टॉवर जोडण्यासाठी केबल टाकण्याचे काम सुरू आहे. जेथे ही सुविधा नाही, अशा भागात वीज खांबावरून केबल टाकले जात आहेत. याबाबत रिलायन्सने महापालिकेसोबत करार केला आहे. ५ हजार खांबावरून केबल टाकले जातील. कंपनीने यासाठी महापालिकेला १.४४ कोटी दिले आहेत.