शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

पती, पत्नीपैकी एकालाच रजा प्रवास सवलत

By admin | Updated: June 11, 2015 01:33 IST

राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रजा प्रवास सवलतीबाबतचे नवीन नियम आज वित्त विभागाने जारी केले. त्यानुसार पती आणि पत्नी दोघेही

मुंबई : राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रजा प्रवास सवलतीबाबतचे नवीन नियम आज वित्त विभागाने जारी केले. त्यानुसार पती आणि पत्नी दोघेही शासकीय सेवेत असतील तर त्यांच्यापैकी एकालाच कुटुंबीयांसह या सवलतीचा लाभ मिळेल. यापूर्वी कर्मचाऱ्याचा गाव महाराष्ट्रात असेल तरच त्याला मुख्यालयापासून गावी जाण्याची प्रवास सवलत मिळत होती. आता राज्याबाहेर वा देशाबाहेरही कर्मचाऱ्याचा गाव असेल तरीही त्याला प्रवास सवलत मिळणार आहे. प्रवास सवलत राज्याच्या भौगोलिक सीमेच्या आतमधील गावांसाठी दिली जाते. या सवलतीसाठी कमाल व किमान अंतराच्या प्रवासाची अट नसेल. मात्र, या सवलतीचे ठिकाण रजेच्या अर्जाद्वारे घोषित करणे तसेच प्रवास सुरू करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्याची पूर्वमान्यता घेणे आवश्यक असेल. स्वग्राम म्हणजे कर्मचाऱ्याचे कायम वास्तव्याचे ठिकाण किंवा त्याच्या सेवापुस्तिकेत नोंदविलेला गाव किंवा मालकीची स्थावर मालमत्ता असलेले जवळच्या नातेवाइकांचे (आईवडील, भाऊ) रहिवासाचे गाव. या मूळ गावी जाण्यासाठी कर्मचाऱ्याला प्रवास सवलत दिली जाते. शासकीय सेवेत दाखल झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत कर्मचाऱ्याने स्वग्राम घोषित करणे बंधनकारक असेल. या कालमर्यादेत स्वग्राम घोषित केलेले असेल तर आपल्या सेवाकाळात एकदा स्वग्राम बदलण्याची कर्मचाऱ्यांना संधी दिली जाणार आहे.