शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

किमान वाजपेयींचे तरी स्मारक पूर्ण करा - मुंडे यांचा सरकारला टोला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 06:46 IST

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसत नाहीत.

मुंबई -  अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच आता माजी पंतप्रधान अटलविहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारण्याची घोषणा सरकारने केली आहे. किमान वाजपेयींचे स्मारक तरी पूर्ण होणार का, असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला.अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरूवात करताना मुंडे यांनी सरकारवर टीका केली. दोन वर्षांत दीड लाख रिक्त पदे भरण्याची घोषणा झाली. गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या ७२ हजार पदांच्या मेगाभरतीपैकी किती पदे भरण्यात आली याची माहिती सरकारने द्यावी. नुसत्या पोकळ घोषणा करून सरकार बेरोजगारांची फसवणूक करीत आहे. संपूर्ण राज्य दुष्काळाच्या संकटात असताना, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलासा दिला असता तर बरे वाटले असते. परंतु तसे न करता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री रथयात्रा काढणार आहेत. तुम्ही स्वत:ला राजे समजता का, असा सवालही मुंडे यांनी केला.राज्यावर चार लाख १४ हजार ४०० कोटींचे कर्ज आहे. गुजरातवर ३२ हजार ४१३ कोटी, उत्तर प्रदेशावर ६२ हजार ९८० कोटी, कर्नाटकावर २७ हजार ६८४ तर मध्य प्रदेशावर ३२ हजार ३६५ रूपयांचे कर्ज आहे. महाराष्ट्रावर इतके कर्ज का वाढले याचा अर्थसंकल्पात उल्लेख नाही. भाजप एक शिस्तबद्ध पक्ष आहे. याचा लौकिक घालवू नका. वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना पक्षात घेऊ नका. अडचणीत आणतील, असा इशारा शेकापचे जयंत पाटील यांनी दिला.

टॅग्स :Gopinath Mundeगोपीनाथ मुंडे