शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मार्चचा शेवटचा आठवडा बँकांच्या सुट्यांचा

By admin | Updated: March 17, 2015 01:38 IST

पुढील आठवड्याच्या शनिवारपर्यंत अर्थात २८ मार्चपर्यंत आटोपून घ्या. कारण २९ मार्चपासून ते थेट ६ एप्रिलपर्यंत बँक सुरू असल्याचे चित्र अभावानेच पाहायला मिळेल.

२८ मार्च ते ५ एप्रिल सुट्यांचा सुकाळ : आताच करा बँकिंग व्यवहाराचे नियोजनमुंबई : तुम्हाला जर कुणाला काही धनादेश द्यायचे असतील अथवा अन्य कोणतेही बँकिंग व्यवहार करायचे असतील तर ते पुढील आठवड्याच्या शनिवारपर्यंत अर्थात २८ मार्चपर्यंत आटोपून घ्या. कारण २९ मार्चपासून ते थेट ६ एप्रिलपर्यंत बँक सुरू असल्याचे चित्र अभावानेच पाहायला मिळेल.२८ मार्च रोजी शनिवार असल्यामुळे बँकांचे व्यवहार अर्धा दिवस होतील. त्यानंतर २९ मार्च रोजी रविवार असल्याने बँका बंद असतील. सोमवार, ३० मार्चला पूर्ण दिवस नियमित कामकाज होईल. मात्र त्यानंतर ३१ मार्च रोजी आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने सरकारी बँका ग्राहकांसाठी बंद असतील. परंतु केवळ ज्यांना करभरणा करायचा आहे, अशाच ग्राहकांसाठी काही विशेष काउंटर्स सुरू असतील. खासगी बँका मात्र ३१ मार्च रोजी ग्राहकांसाठी खुल्या राहतील. ३१ मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाची सुटी ही १ एप्रिल रोजी असल्याने बँका पूर्णपणे बंद राहतील. त्यानंतर २ एप्रिल रोजी महावीर जयंती, ३ एप्रिल रोजी गुड फ्रायडे अशा सलग दोन सुट्या आहेत, तर ४ एप्रिलला पुन्हा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज अर्ध्या दिवसाचे असेल, तर ५ एप्रिल रोजी रविवार असल्याने पुन्हा बँका बंद राहतील. परिणामी, ६ एप्रिलपासून बँकांचे व्यवहार पूर्ववत होतील.नेट बँकिंग, आॅनलाइन ट्रान्स्फर, रोख व्यवहारातही अडचणच्नेट बँकिंगद्वारे जे आॅनलाइन ट्रान्स्फर व्यवहार होतील, त्यालादेखील खीळ बसेल. अन्य बँकांप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेलाही सुटीचे कॅलेंडर लागू असल्याने एनईएफटी व आरटीजीएसतर्फे जे व्यवहार होतात, त्याचे रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती सर्व्हरमधून क्लिअरिंग होणार नाही.च्बँक सुट्यांच्या काळात ४८ तासांच्या आत एटीएममध्ये खडखडाट दिसून येतो. शनिवार, २८ मार्च रोजी एटीएममध्ये पैशांचा भरणा झाल्यावर ३० व ३१ मार्चला पैशांचा भरणा होईल. त्यानंतर मात्र थेट ४ एप्रिल रोजी एटीएममध्ये पैसे भरले जातील. परिणामी, १ ते ४ एप्रिल या कालावधीमध्ये एटीएममध्ये खडखडाट असेल.