शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

 नवी मुंबईतील सिडकोमध्ये १७६७ कोटींचा जमीन घोटाळा, काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांसह सरकारवर गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 4:57 PM

नवी मुंबईतील सिडकोमधील जमिनीच्या व्यवहारावरून काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई - नवी मुंबईतील सिडकोमधील जमिनीच्या व्यवहारावरून काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.  सिडकोमधील १७६७ कोटी रुपये किमतीच्या 24 एकर जमिनीची अवघ्या तीन कोटी रुपयांना व्यवहार  झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या घोटाळ्यामुळे मंत्रालयातील काही मंत्री आणि बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग असून, हा घोटाळा झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसकडून आज मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित होते. यावेळी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी राज्य सरकारवर सनसनाटी आरोप केले. "कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेले ८ शेतकरी कुटुंबांना नवी मुंबईत विमानतळाजवळ रांजणपाडा, खारघर येथे २४ एकर जमीन देण्यात आली होती. नवी मुंबई विमानतळाजवळ मोक्याच्या ठिकाणी हि २४ एकर जमीन असल्याने हिची आत्ताची किंमत सुमारे १७६७ कोटी होते. हीच जमीन या ८ शेतकरी कुटुंबांकडून पॅराडाइज बिल्डरच्या मनीष भतीजा आणि संजय भालेराव यांनी रुपये १५ लाख प्रती एकर अशा कवडीमोल भावाने दमदाटी करून विकत घेतली. म्हणजेच सुमारे १७६७ कोटीची जमीन या बिल्डरने फक्त ३ करोड ६० लाख रुपयांना जबरदस्तीने घेतली. या व्यवहारामध्ये प्रमुख मुद्दा हा आहे कि हि जमीन सिडकोच्या अखत्यारीत येत असताना देखील तहसीलदार कार्यालय, रायगड येथून हि जमीन हस्तांतरण करण्यास२६ फेब्रुवारी २०१८ रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे. सरकारच्या महसूल विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्या हस्तक्षेपाशिवाय हे होऊ शकत नाही. कोयना प्रकल्पामुळे हजारो शेतकरी विस्थापित झाले मात्र याच ८ शेतकरी कुटुंबांना नवी मुंबई सारख्या चांगल्या ठिकाणी जागा कशी काय दिली जाते ? याचे कारण हे आहे कि पॅराडाइज बिल्डरने याआधीच या जागेसाठी करार केले होते. हे सगळे भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले प्रसाद लाड यांच्या आशीर्वादाने  झालेले आहे, असा आरोप निरुपम यांनी केला आहे. सिडकोमधील 24 एकर जमिनीचा व्यवहार झाला असून, कोयना प्रकल्पग्रस्तां देण्यात आलेली आणि बाजारभावाप्रमाणे सुमारे १७६७ कोटी रुपये किंमत असलेली ही जमीन अवघ्या तीन कोटी रुपयांना विकण्यात आली. या जमिनीची मनिष भतिजा आणि संजय भालेराव  यांना विक्री करण्यात आली असून, यामधील मनीष भतिजा हा भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला.

 ''कोयना प्रकल्पामुळे हजारो शेतकरी विस्थापित झाले परंतु फक्त याच ८ शेतकरी कुटुंबांनाच नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी जमीन कशी देण्यात आली ? विस्थापितांना शेतीचीच जमीन देण्याचा सरकारचा नियम आहे परंतु यांना शहरातील जमीन कशी काय दिली ? नियमाप्रमाणे हे शेतकरी १० वर्षे त्यांची जमीन विकू शकत नाही मग हा व्यवहार कसा काय झाला ?'' असे सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले.  

काँग्रेसकडून करण्यात आलेले आरोप - १७६७ कोटींचा भूखंड अवघ्या तीन कोटी रुपयांना व्यवहार- सर्वे नंबर 183/CD, रांजनपाडा, खारघर येथील जमिनीचा व्यवहार- एकाच दिवसात सर्वे, भूसंपादन आणि हस्तांतरण झाले-सिडकोची जमीन असूनही, तहसीलदारांकडून हस्तांतरण-  सिकडोकडून त्यावर आक्षेपही घेण्यात आला नाही- दीड वर्ष लागणारे व्यवहार एका दिवसात पूर्ण झाले- सिडको-नगरविकास आणि बिल्डर यांचे साटेलोटे- मनीष भतिजा, संजय भालेराव यांच्या नावाने जमिनीची खरेदी विक्री - मनीष भतिजा हा पॅराडाइज बिल्डरचा मालक - पॅराडाइज बिल्डरवर सरकारचा वरदहस्त- व्यवहारात प्रसाद लाड यांचाही सहभाग

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcidcoसिडको