शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा निधी कधी? आदिती तटकरे म्हणाल्या, "तशी घोषणा आम्ही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 16:28 IST

राज्यात सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. आता या योजनेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana: राज्यात पुन्हा सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. पण, आता या योजनेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यात 2100 रुपये मिळतील, अशी घोषणाच आम्ही केली नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेद्वारे 2100 रुपये देणार असल्याची घोषणा आम्ही केलेली नाही, असे वक्तव्य महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी केले आहे. 

काय म्हणाल्या आदिती तटकरे ?आज अधिवेशनात आदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली. येत्या अर्थसंकल्पात किंवा अधिवेशनाच्या काळात 2100 रुपये देऊ, असे कोणतेही वक्तव्य आम्ही केले नव्हते. सरकार एखादी योजना जाहीर करते, तेव्हा जाहीरनामा हा 5 वर्षांचा असतो. या अर्थसंकल्पात 2100 रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात एक विभाग म्हणून आम्ही आमचा प्रस्ताव शासनाजवळ ठेवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांबाबतची घोषणा होण्याची शक्यता होती. राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणी या 2100 रुपयांची वाट पाहत होत्या,  मात्र आदिती तटकरेंच्या वक्तव्याने राज्यातील लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा पडली आहे. दरम्यान, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक चांगली बातमीही आदिती तटकरेंनी दिली आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 पैसे एकत्र खात्यात येणार आहेत. 

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाAditi Tatkareअदिती तटकरेBJPभाजपाMahayutiमहायुतीwomen and child developmentमहिला आणि बालविकासWomenमहिला