कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे राष्ट्रीय स्तरावरील गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 14:52 IST2020-02-02T14:51:07+5:302020-02-02T14:52:02+5:30

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे राष्ट्रीय स्तरावरील गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

Kusumagraj Foundation announces Godavari glory award at national level | कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे राष्ट्रीय स्तरावरील गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर  

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे राष्ट्रीय स्तरावरील गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर  

नाशिक -कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे राष्ट्रीय स्तरावरील गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.  पद्मश्री दर्शना जव्हेरी (नृत्य), भगवान रामपुरे (शिल्प), काका पवार (क्रीडा),  श्रीगौरी सावंत (लोकसेवा), सई परांजपे (चित्रपट), डॉ. माधव गाडगीळ (विज्ञान) यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. 
21 हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 10 मार्च या कुसुमाग्रजांच्या  स्मृतिदिनी हा पुरस्कार वितरण सोहळा कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी 6 वाजता प्रतिष्ठानचे अध्यक्ष  माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर  यांच्या हस्ते होईल. पुरस्कार घोषणाप्रसंगी प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद हिंगणे, अड विलास लोणारी, गुरमीत बग्गा आदी उपस्थित होते.

पुरस्कार विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत 
1) नृत्य - पद्मश्री दर्शना जव्हेरी ( मणिपुरी नृत्य) 
2) शिल्प - भगवान रामपुरे, सोलापूर
3) क्रीडा - काका पवार, कुस्ती प्रशिक्षक
4) लोकसेवा - श्रीगौरी सावंत, ट्रान्सजेंडर व्यक्तींना ओळख मिळवून देण्यात योगदान
5) चित्रपट - सई परांजपे, दिग्दर्शक, निर्माती
6) विज्ञान - डॉ. माधव गाडगीळ, जैवशास्त्रीय संरक्षित वन कल्पनेचे जनक 

Web Title: Kusumagraj Foundation announces Godavari glory award at national level