शहरं
Join us  
Trending Stories
1
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
2
'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
3
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
4
"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
5
जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
6
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
7
झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही? नितेश राणेंचा पर्यावरणप्रेमींना सवाल; म्हणाले, 'हा भाजपचा कार्यक्रम नाही'
8
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
9
असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील पहिला गोलंदाज ठरला स्टार्क; पाकच्या वसीम आक्रमचा विक्रमही मोडला
10
Mumbai: गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद; विद्यार्थिनींचे उपोषण, एमआयएमचा पाठिंबा!
11
अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप
12
बापमाणूस! "मी म्हातारा झालो नाही, पैसे कमवेन, तू फक्त..."; रात्री २ वाजता लेकीचा वडिलांना फोन
13
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
14
VIRAL : १२वीच्या मुलाने गर्लफ्रेंडवर 'अशी' ठेवली पाळत; पद्धत बघून शेजाऱ्यांनाही बसला मोठा धक्का!
15
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
17
सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
18
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
19
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
20
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
Daily Top 2Weekly Top 5

झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही? नितेश राणेंचा पर्यावरणप्रेमींना सवाल; म्हणाले, 'हा भाजपचा कार्यक्रम नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:26 IST

नाशिकमध्ये साधूग्रामसाठी १८०० झाडांवर कुऱ्हाड पडणार असल्याचे समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे.

Nitesh Rane on Tapovan Trees:  प्रयागराज कुंभमेळ्यानंतर सुमारे दीड वर्षांनी नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीने वेग घेतला असताना, नाशिकच्या तपोवन परिसरात तयार करण्यात येणाऱ्या साधूग्राममुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. साधू-महंतांच्या वास्तव्यासाठी सुमारे ११५० एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्याचे नियोजन आहे, ज्यामध्ये तपोवनमधील ५४ एकर महापालिकेच्या जागेचा समावेश आहे. मात्र याच जागेवरील सुमारे १८०० झाडे तोडण्याच्या नोटिशीमुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विरोधकांनीही यावर आक्षेप घेतल्याने कॅबिनेट मंत्री नितेश राणे पर्यावरण प्रेमींना सवाल विचारला आहे.

नाशिक महानगरपालिकेने तपोवनमधील सुमारे १७०० हून अधिक विविध प्रजातींच्या वृक्षांचे पुनर्रोपण आणि काही फांद्यांची छाटणी करण्याबाबत नोटीस काढून नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या होत्या. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याची शक्यता लक्षात येताच केवळ पर्यावरणप्रेमीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनीही शेकडोंच्या संख्येने आक्षेप नोंदवले. या संवेदनशील मुद्द्याने तात्काळ राजकीय वळण घेतले. राज्याचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही पर्यावरणप्रेमींच्या बाजूने आवाज उचलला. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि विजय वडेट्टीवार तसेच अजित पवार यांनीही या वृक्षतोडीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत पर्यावरणाचे जतन करण्याचे आवाहन केले.

या वादात कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनीही उडी घेतली. मात्र, त्यांनी या वादाला वेगळी दिशा देत, झाडाला मिठी मारता तशी बकरीला का मिठी मारत नाही? असा सवाल केला. तसेच आपल्या सणांच्या वेळीच असे प्रश्न उपस्थित केले जातात, असेही नितेश राणे म्हणाले.

"बकऱ्यांच्या कत्तलीनंतर रक्ताचे पाणी वाहत असल्याचे अनेकवेळा पाहायला मिळतं. पण तेव्हा पर्यावरणप्रेमी आवाज उठवताना आम्हाला दिसत नाही. व्हर्च्युवल बकरी ईद करा असंही सांगताना दिसत नाही. मग एका धर्माला एक आणि दुसऱ्या धर्माला एक न्याय कशासाठी? झाडाला मिठी मारता चांगली गोष्ट आहे. झाडं जगली पाहिजेत हा पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य मुद्दा आहे. मग झाडाला मिठी मारता तशी बकरीला का मिठी मारत नाही. बकरी प्राणी नाहीये का? तेव्हा प्राणी प्रेमी कुठे असतात हाच माझा प्रश्न आहे. विजय वडेट्टीवार विसरले असतील की ते काँग्रेसचे नेते होण्याआधी हिंदू आहेत. आपल्या सणांच्या वेळी असे प्रश्न विचारले जातात. पण अन्य धर्मांच्या सणांच्या वेळी हे गप्प का? एवढाच प्रश्न विचारला त्यात चूक काय?," असा सवाल नितेश राणेंनी केला.

"तिथे कुंभमेळा होत असल्याने साधूग्रामसाठी तिथे जागा तयार केली जात आहे. झाड तोडणं हा मुद्दा वेगळा आहे. कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. त्याची काही लोकांना अॅलर्जी झालेली आहे. म्हणून कुंभमेळ्याला बदनाम केले जात आहे. इथे भाजप, राष्ट्रवादीचा विषय नाही. हिंदू म्हणून बोलण्यात काय चूक आहे. कुंभमेळा हा भाजपचा कार्यक्रम आहे का? हिंदू समाजाच्या कार्यक्रमावेळीच अचानक प्रश्न विचारले जात असतील, अचानक झाडांना मिठ्या मारल्या जात असतील तर प्रश्न विचारायचा नाही का? बकऱ्या कापता तेव्हा पर्यावरणाची हानी होते. तेव्हा प्रश्न विचारण्याऐवजी हे लोक कुठल्या झाडावर चढलेले असतात," अशी टीका नितेश राणेंनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Rane questions tree-huggers: Why not hug goats? It's not BJP's event.

Web Summary : Nitesh Rane questions environmentalists protesting tree cutting for Nashik's Kumbh Mela. He asks why they don't protest goat slaughter during festivals, alleging hypocrisy and anti-Hindu bias. Rane clarifies the event isn't BJP-related.
टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाNitesh Raneनीतेश राणे Nashikनाशिक