शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची केळी जम्मू-काश्मीरला

By admin | Updated: December 26, 2014 00:04 IST

तमदलगेच्या संस्थेचा पुढाकार : बाजारभावापेक्षा १० ते १५ टक्के जादा दराने खरेदी

जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, करवीर, कागल, शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील केळी तमदलगे (ता. शिरोळ) येथील संजीवनी अ‍ॅग्रो फळे व फुले खरेदी-विक्री संघाच्यावतीने जम्मू-काश्मीरला पाठविण्यात येत आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना संघाच्यावतीने लागवडीपासून ते विक्रीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन करून केळी लागवड वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.महाराष्ट्र शासन कृषी पणन विभाग यांच्या सहकार्याने व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तमदलगे येथील संजीवनी अ‍ॅग्रो फळे व फुले खरेदी विक्री संघाच्यावतीने हातकणंगले, शिरोळ, करवीर, कागल, शाहूवाडी व पन्हाळा या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना केळी लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन जास्तीतजास्त उत्पादन काढण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. उत्पादित झालेली केळी बाजारभावापेक्षा १० ते १५ टक्के जादा दराने खरेदी करून इतर राज्यांमध्ये पाठविण्यात येतात. शाहूवाडी तालुक्यातील जगन्नाथ हिरूगडे यांच्या दीड एकर शेतामध्ये केळी लागवड करून आतापर्यंत ३१ टन केळी दुसऱ्या राज्यामध्ये पाठविण्यात आली आहे. प्रतिटन ११ हजार रुपये दराप्रमाणे संघाच्यावतीने खरेदी करून केळी लागवडीला प्रोत्साहन देण्याचे काम कंपनीचे सल्लागार सागर कोपार्डेकर, अध्यक्ष चेतन पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर बाबा आडमुठे हे करीत आहेत. नुकतेच कृषी विभागाचे तंत्र सहायक दिलीप दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केळी पाठविण्यात आली. यावेळी दिलीप सबनीस, नामदेव खोत, प्रमोद चौगुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)