500 उठाबशा काढायला लावणा-या मुख्याध्यापिकेचे वेतन रोखले,गरज पडली तर फौजदारी कारवाई - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 02:51 PM2017-12-14T14:51:50+5:302017-12-14T14:58:08+5:30

गृहपाठ केला नाही म्हणून कोल्हापूरात एका विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडला.  300 उठाबशा काढून ही विद्यार्थिनी कोसळली.

kolhapur teacher punishes girl student with 500 situps | 500 उठाबशा काढायला लावणा-या मुख्याध्यापिकेचे वेतन रोखले,गरज पडली तर फौजदारी कारवाई - विनोद तावडे

500 उठाबशा काढायला लावणा-या मुख्याध्यापिकेचे वेतन रोखले,गरज पडली तर फौजदारी कारवाई - विनोद तावडे

Next

नागपूर: गृहपाठ पूर्ण न केल्याबद्दल आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला 500 उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्यात आल्याची माहिती  शालेय शिक्षण मंत्री  विनोद तावडे यांनी आज येथे दिली. या प्रकरणाची चौकशी करुन गरज पडली तर फौजदारी कारवाई केली जाईल असं विनोद तावडेंनी सांगितलं. 
विद्यार्थिनीवर उपचार सुरू, पण मुख्याध्यापिकेवर अद्याप कारवाई नाही -
गृहपाठ केला नाही म्हणून कोल्हापूरात एका विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडला.  300 उठाबशा काढून ही विद्यार्थिनी कोसळली. तिच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. उठबशा काढल्याने विद्यार्थिनीच्या पायाला सूज आली असून तिच्यावर सध्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 
चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रूक गावात ही घटना घडली आहे. या गावातील भावेश्वरी शाळेत संबंधित विद्यार्थिनी आठवीत शिकते आहे. तिने गृहपाठ केला नव्हता. या कारणासाठी शाळेच्या शिक्षिका अश्विनी देवाण यांनी तिला 500 उठबशा काढण्याची शिक्षा दिली. 300 उठबशा काढल्यावर मुलगी कोसळली. तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान, शिक्षिका अश्विनी देवाण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी अजूनही या शिक्षिकेवर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.

Web Title: kolhapur teacher punishes girl student with 500 situps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.