भाजपा कार्यकारिणीसाठी कोल्हापूर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2015 01:20 IST2015-05-22T01:20:43+5:302015-05-22T01:20:43+5:30

भारतीय जनता पार्टीची शुक्रवारपासून तीन दिवस कोल्हापुरात प्रदेश कार्यकारिणीची बैठक तसेच राज्य परिषद होत आहे.

Kolhapur ready for BJP executive | भाजपा कार्यकारिणीसाठी कोल्हापूर सज्ज

भाजपा कार्यकारिणीसाठी कोल्हापूर सज्ज

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीची शुक्रवारपासून तीन दिवस कोल्हापुरात प्रदेश कार्यकारिणीची बैठक तसेच राज्य परिषद होत आहे. त्याची जय्यत तयारी करण्यात आली असून या बैठकीसाठी वातानुकूलित बंदिस्त मंडप उभारला असून सुमारे एक हजार पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील. त्याच्या शेजारीच सुमारे बारा हजार लोक बसतील इतक्या क्षमतेचा भव्य व खुला मंडप उभारला आहे.
शनिवारी सकाळी ११ वाजता बैठकीचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. रविवारी बैठकीचा जाहीर समारोप दुपारी १२ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
अमित शहा यांचा शुक्रवार व शनिवार असा दोन दिवस कोल्हापुरात मुक्काम राहणार आहे. शुक्रवारी रात्री ते कोल्हापुरात येणार आहेत. कोल्हापुरातील ही तिसरी बैठक आहे. यापूर्वी १९८९ व २०१० मध्ये बैठक झाली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Kolhapur ready for BJP executive