कामाचा माणूस! ‘त्या’ दिवशी अजितदादांनी कोणती कागदपत्रे मागवली होती? मित्राने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:12 IST2026-01-30T14:10:31+5:302026-01-30T14:12:28+5:30

Ajit Pawar Sad Demise: कामाचा माणूस अशी ख्याती असलेले अजित पवार जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत होते, याची साक्ष विमान अपघातानंतर त्या स्थळी पसरलेल्या कागदपत्रांवरून येते.

know about which documents did ajit pawar ask for on that accident day close friend makes a big revelation | कामाचा माणूस! ‘त्या’ दिवशी अजितदादांनी कोणती कागदपत्रे मागवली होती? मित्राने केला मोठा खुलासा

कामाचा माणूस! ‘त्या’ दिवशी अजितदादांनी कोणती कागदपत्रे मागवली होती? मित्राने केला मोठा खुलासा

Ajit Pawar Sad Demise: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी १२ वाजून ८ मिनिटांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ व जय पवार यांनी मुखाग्नी दिला. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, खा. सुप्रिया पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. लाखो कार्यकर्ते आणि बारामतीकरांनी अश्रू ढाळत लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील विविध नेते आणि मंत्रिमंडळातील सहकारी खासदार, आमदारांसह मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. यातच आता अजित पवारांनी कोणती कागदपत्रे मागवली होती, याबाबत जवळच्या मित्राने मोठा खुलासा केला आहे. 

'दादा... आम्हाला सोडून जाऊ नका... परत या!' या हृदय हेलावून टाकणाऱ्या आक्रोशात बारामती अक्षरशः अश्रूंनी न्हाऊन निघाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यदर्शनासाठी आणि अंत्ययात्रेसाठी बारामतीत जनसागर उसळला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शोकभाव होते. अजित पवारांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येताच नागरिक, कार्यकर्ते, महिला, वृद्ध, युवक मोठ्या संख्येने दाखल झाले. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर ओठांवर 'अजितदादा अमर रहे', ही एकच हाक होती. कामाचा माणूस अशी ख्याती असलेले अजित पवार जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत होते, याची साक्ष विमान अपघातानंतर त्या स्थळी पसरलेल्या कागदपत्रांवरून येते. यातच ज्या दिवशी अपघात झाला, त्या दिवशी कोणती कागदपत्रे मागवली होती, याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. 

कामाचा माणूस! ‘त्या’ दिवशी अजितदादांनी कोणती कागदपत्रे मागवली होती?

अजित पवार यांचे जवळचे मित्र आणि विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांनी माध्यमांशी संवाद साधताना एक मोठा खुलासा केला आहे. अजित पवारांशी झालेल्या माझ्या शेवटच्या फोन कॉलमध्ये त्यांनी मला निवडणुकीशी संबंधित काही कागदपत्रे मागितली होती. त्यांच्या पुढच्या प्लॅनिंगच्या संदर्भातील ती काही कागदपत्रे होती. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणची चर्चा आहे. अजित पवारांबरोबर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणबाबत बैठक झाली होती अशी चर्चा आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना किरण गुजर यांनी म्हटले आहे की, हो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. ही आमची इच्छा आहे आणि अजित पवार यांची देखील शेवटची इच्छा हीच होती की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायला पाहिजे.

दरम्यान, अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले आहे. यावेळी संपूर्ण पवार कुटुंब होते, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर सरकारमध्ये सहभागी व्हायचं की सरकारमधून बाहेर पडायचे? याबाबत अजित पवार काही बोलले होते का? यावर, नाही, याबाबत अजित पवार काहीही बोलले नव्हते. मात्र, याबाबत पवार कुटुंबात चर्चा सुरू होत्या आणि या चर्चा सकारात्मक होत्या. अजित पवारांनी माझ्याशी बोलताना हेच म्हटले होते की, शेवटी एकत्र यायचे आहे, असे गुजर यांनी म्हटले आहे. 

 

Web Title : अजित पवार के अंतिम दस्तावेज: मित्र ने बताया मृत्यु से पहले क्या मांगा था।

Web Summary : अपनी मृत्यु से पहले, अजित पवार ने चुनाव संबंधी दस्तावेजों का अनुरोध किया था, भविष्य की रणनीतियों की योजना बना रहे थे। एक करीबी मित्र ने खुलासा किया कि पवार दोनों एनसीपी गुटों के एकीकरण की इच्छा रखते थे।

Web Title : Ajit Pawar's Last Documents: Friend Reveals What He Requested Before Demise.

Web Summary : Before his death, Ajit Pawar requested election-related documents, planning future strategies. A close friend disclosed Pawar desired the unification of both NCP factions, a topic of ongoing family discussions.