दोन वर्षांच्या बालकाचे अपहरण

By Admin | Updated: February 11, 2016 01:33 IST2016-02-11T01:33:04+5:302016-02-11T01:33:04+5:30

अजनी येथील विश्वकर्मानगरात एका दोन वर्षाच्या चिमुकल्याचे त्याच्या घराजवळूनच अपहरण करण्यात आले. ३६ तास उलटूनही मुलाचा कुठलाही पत्ता लागला नसल्याने पोलीसही हादरले आहेत.

Kidnapping of two-year-old child | दोन वर्षांच्या बालकाचे अपहरण

दोन वर्षांच्या बालकाचे अपहरण

नागपूर : अजनी येथील विश्वकर्मानगरात एका दोन वर्षाच्या चिमुकल्याचे त्याच्या घराजवळूनच अपहरण करण्यात आले. ३६ तास उलटूनही मुलाचा कुठलाही पत्ता लागला नसल्याने पोलीसही हादरले आहेत.
शेबू ऊर्फ राज अजय पांडे असे अपहृत मुलाचे नाव आहे. मुलगा परतल्याचे समजून अजय यांनी आपली गाडी काढली आणि ते निघून गेले. तर, मुलगा वडिलांसोबत गेल्याचे समजून आई खुशीनेही लक्ष दिले नाही. काही वेळानंतर अजय घरी परत आले. त्यांनी पत्नीला मुलाबाबत विचारले. तेव्हा मुलगा कुठे दिसून येत नसल्याचे लक्षात आले. रात्री १२ वाजेपर्यंत शेबू न सापडल्याने पोलिसांकडे त्याच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.

तरुणीवर संशय
पोलिसांनी संशयाच्या आधरावर एका तरुणीला ठाण्यात विचारपूस करण्यासाठी आणले आहे. ती तरुणी मागील काही दिवसांपासून वस्तीत फिरत आहे.
तिने परिसरातील काही घरांमध्ये कपडे बदलले होते. नागरिकांना तिच्यावर संशय आल्याने तिला ठाण्यात आणण्यात आले. कपडे खराब झाल्याने ते बदलल्याचे तिचे म्हणणे आहे.

Web Title: Kidnapping of two-year-old child