शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
4
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
5
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
6
अरे देवा! भांडी घासताना काचेच्या ग्लासमध्ये अडकला हात, सर्जरीनंतरच झाली सुटका
7
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
8
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
9
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
10
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
11
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
12
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
13
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
14
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
15
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
16
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
17
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
18
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
19
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
20
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:48 IST

भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन बैठक झाली. कृषीचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. 

 

पुणे : ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम महत्त्वाचा आहे. सध्या धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना यावर्षी पाण्याची टंचाई भासणार नाही. त्यामुळे यंदा रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामाचे नियोजन अधिक सक्षम व समन्वित पद्धतीने करून शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा सूचना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला दिल्या.      

भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन बैठक झाली. कृषीचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. 

हरभरा, गव्हाचे पीक भरघोस येणारभरणे म्हणाले, “राज्यात दरवर्षी सरासरी ५७ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड होते. यावर्षी अतिवृष्टीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपेक्षा अधिक होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी सुमारे तीस लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर हरभरा व गव्हाची पेरणी होईल. 

बियाणे, खतांची चिंता सोडारब्बी हंगामात ११ लाख २३ हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. प्रत्यक्षात १४ लाख ५८ हजार क्विंटल बियाणे शिल्लक आहे. केंद्र सरकारकडून ३१ लाख ३५ हजार टन खते मिळणार आहे. राज्यात सध्या १६ लाख १० हजार टन खत उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

त्यामुळे ‘राष्ट्रवादी’ची यंदा काळी दिवाळी : शरद पवारबारामती : मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही. त्यामुळे आमच्या पक्षाला राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी खंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गोविंदबाग निवासस्थानी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Excessive Rain Ruins Kharif, Rabi Season Offers Hope to Farmers

Web Summary : Rabi season offers hope after Kharif crop losses due to heavy rains. Dams and wells are full, potentially increasing Rabi cultivation to 65 lakh hectares. Agriculture Minister emphasizes coordinated planning for farmer benefits. Pawar criticizes inadequate government aid for flood-affected farmers.
टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारRainपाऊस