शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

दाऊद प्रकरणी खडसेंना क्लीन चिट

By admin | Updated: May 22, 2016 08:32 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबीन हिच्या नावे असलेल्या दूरध्वनीवरून आपल्या मोबाइलवर कॉल आले होते, हे आपच्या नेत्या प्रीती मेनन यांचे आरोप एकनाथ खडसे यांनी फेटाळून लावले.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २२-  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या घरातून फोन आल्याच्या प्रकरणात महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने क्लीनचीट दिली आहे. सप्टेंबर २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत ९४२३०७३६६७ या क्रमांकावर कोणताही कॉल आला नाही. तसेच या क्रमांकावरून कोणताही कॉल करण्यात आलेला नसल्याचे मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. 

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या मोबाइलवर कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्या घरातून फोन आले असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत झाल्यानंतर आम्ही ९४२३०७३६६७ या क्रमांकाचे सर्व तपशील तपासले अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. 
 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबीन हिच्या नावे असलेल्या दूरध्वनीवरून एकनाथ खडसेंना फोन आले होते असा आरोप आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी शनिवारी केला होता. मेनन यांचे हे आरोप महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी फेटाळून लावले. मात्र आपल्या आरोपांचा पुनरुच्चार करताना प्रीती मेनन यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत खडसे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केली. मेनन यांनी आरोप केले असले तरी तशी तक्रार आपणाकडे केलेली नाही, असे जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले. दाऊदच्या कराची येथील पत्त्यावर नमूद असलेल्या चार विविध दूरध्वनी क्रमांकांवरून ५ सप्टेंबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या काळात खडसे यांना कॉल आले, असा आरोप करताना प्रीती मेनन यांनी संबंधित कागदपत्रांचा हवाला दिला आणि खडसे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही मेनन यांनी केली. मनीष लीलाधर भंंगाळे या जळगावच्या तरुणाने पाकिस्तानी दूरसंचार कंपनीचे संकेतस्थळ हॅक करून ही माहिती काढल्याचे त्यांनी सांगितले.

हॅकिंगच्या माध्यमातून ५ सप्टेंबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या कालावधीत ही माहिती काढण्यात आली. त्यानुसार, या प्रकरणात ५ पाच भारतीय क्रमांकांचा समावेश असल्याची माहिती उघडकीस आली. त्यात महाराष्ट्रातील महसूल मंत्री खडसे यांच्या मोबाइल क्रमांकाच्या समावेश आहे. याप्रकरणी, अधिक चौकशी करण्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याचे प्रीती मेनन यांनी सांगितले. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत खडसे यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी मेनन यांनी केली.

विशेष म्हणजे प्रीती मेनन यांची पत्रकार परिषद संपताच मनीष भंंगाळे याने त्याच ठिकाणी पत्रकार परिषद घेत खडसे यांना दाऊदच्या घरातून फोन केले गेले असा आरोप केला. कोणत्याही राजकीय पक्षाशी आपला संबंध नसल्याने मी स्वतंत्रपणे माहिती देत असून मला याबाबत अनेकांकडून आॅफर आल्या तसेच ठार मारण्याच्या धमक्या आल्या आहेत, असे भंगाळे याने सांगितले. तर हॅकिंग प्रक्रियेत आयडिया कंपनी, पाकिस्तान टेलिकॉम कंपनीच्या डेटातून या कॉलची माहिती मिळाली. शिवाय, याकरिता खास दोन-तीनवेळा दुबईला जाऊन आलो, असेही भंगाळे याने सांगितले. मोबाइल क्रमांक वापरात नाही.

आरोप फेटाळताना खडसे म्हणाले, ९४२३०७३६६७ या आपल्या मोबाइल क्रमांकाचा उल्लेख केला आहे, तो गेल्या एक वर्षापासून वापरात नाही. या क्रमांकावर या काळात आंतरराष्ट्रीय कॉल आलेला नाही किंवा त्यावरून कॉल परदेशात केलेला नाही. संबंधित कंपनीने तसे लेखी कळविले आहे. हा मोबाइल क्रमांक क्लोन करून तो वापरला गेला असण्याची शक्यता आहे. याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी मीच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

पाकमधील या क्रमांकावरून खडसेंना फोनदाऊदच्या पत्नीच्या नावे असलेल्या विविध दूरध्वनी क्रमांकांवरून खडसे यांच्या नावे असलेल्या मोबाइलवर संपर्क साधण्यात आल्याचा आरोप आहे. ते दूरध्वनी क्रमांक असे : ०२१-३५८७१६३९, ०२१-३५८७१७१९, ०२१-३५८७१८३९, ०२१-३५३६०३६०