शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंना मिळाले अजित पवारांचे दालन

By admin | Updated: November 8, 2014 03:52 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांसाठीच्या दालनांचे वाटप केले असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्य इमारतीमधील सहाव्या मजल्यावरील दालन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांसाठीच्या दालनांचे वाटप केले असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्य इमारतीमधील सहाव्या मजल्यावरील दालन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना दिले आहे. गृह खात्यासाठी आग्रही राहिलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना ते खाते काही मिळाले नाही, पण माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे दालन मात्र मिळाले आहे. तर पाचव्या मजल्यावरील नव्याने उभारलेले सुसज्ज असे हर्षवर्धन पाटील यांचे दालन वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे. त्यांच्या शेजारचे दालन सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. उद्योगमंत्री प्रकाश महेता यांना सहाव्या मजल्यावरच मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दालन दिले आहे. चौथ्या मजल्यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दालन दिले गेले आहे. आदिवासी मंत्री विष्णू रामा सवरा यांना मंत्रालय विस्तार इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरचे दालन दिले आहे. तर राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना विस्तारित इमारतीतील पाचव्या मजल्यावरील दालन क्रमांक ५०२ दिले आहे. राज्यमंत्री विद्या ठाकूर यांना विस्तारित इमारतीतील पहिल्याच मजल्यावरील ११५ व ११७ अशा दोन दालनांचे कार्यालय दिले आहे. (विशेष प्रतिनिधी)