खाडेंना अटकपूर्व जामीन मंजूर

By Admin | Updated: October 14, 2014 01:33 IST2014-10-14T01:33:35+5:302014-10-14T01:33:35+5:30

सांगलीतील कवठे-महांकाळ विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार सुधाकर खाडे यांना उच्च न्यायालयाने सोमवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला़

Khadane granted anticipatory bail | खाडेंना अटकपूर्व जामीन मंजूर

खाडेंना अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई : सांगलीतील कवठे-महांकाळ विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार सुधाकर खाडे यांना उच्च न्यायालयाने सोमवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला़
खाडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली आह़े यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून खाडे यांनी न्यायालयात धाव घेतली़ निवडणुकीचा अर्ज भरल्यापासून विरोधक आपल्याला बलात्काराच्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत़ या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही़ तेव्हा यात अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी खाडे यांनी  केली़ न्या़ मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ त्यात खाडे यांना 2क् हजारांचा जामीन मंजूर केला़ खाडे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवल्यानंतर आऱआऱ पाटील यांनी वादग्रस्त विधान केले होत़े त्यावर टीका झाल्यावर पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)

 

Web Title: Khadane granted anticipatory bail