शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

केरळ लोकसेवा आयोग हे 'एमपीएससी'च्या तुलनेत मनुष्यबळाच्या दृष्टीने खूपच सक्षम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 6:31 AM

एमपीएससीकडे अपुरे मनुष्यबळ; परीक्षेवर परिणाम

ठळक मुद्देकेरळ आयोगाकडे स्पर्धां परीक्षा घेण्यासाठी 1 हजार 641 तर एमपीएससीकडे 271 मनुष्यबळ

पुणे: केरळ राज्य महाराष्ट्रपेक्षा कैक पटीने लहान असूनही केरळ लोकसेवा आयोग हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तुलनेत मनुष्यबळाच्या दृष्टीने खूप सक्षम आहे. केरळ आयोगाकडे विविध स्पर्धां परीक्षा घेण्यासाठी 1 हजार 641 तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केवळ 271 एवढे मनुष्यबळ आहे. त्यामुळे राज्य शासनाने एमपीएससीला अधिक सक्षम करावे,अशी मागणी सातत्याने केली जात आहे.        शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी;यासाठी सर्व पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून व्हावी,अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वारंवार केली. मात्र, राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष करत महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून अनेक पदांची भरती प्रक्रिया राबवली.परंतु, त्यास तीव्र विरोध झाल्याने अखेर महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात आले. आता काही पदांची भरती विभागीय स्तरावर केले जाणार आहे.तरीही स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी समाधनी नाहीत.            एमपीएससीकडून गट अ व ब दर्जाच्या राजपत्रित पदांची भरती, मुंबई महापालिकेतील लिपिकांची भरती, वस्तू व सेवा कर विभागातील कर सहाय्यकांची पदांची असेच बेस्ट मधील वरिष्ठ पदांची भरती प्रक्रिया राबविली जाते. तर केरळ लोकसेवा आयोगाकडून केरळ राज्य सरकार, वीज मंडळ, परिवहन मंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था ,15 शिखर सहकारी संस्था व सहकारी बँका आणि इतर महामंडळात मधील पदांची भरती प्रक्रिया राबविली जाते.----------------------केरळ लोकसेवा आयोगाकडे  मनुष्यबळअध्यक्ष -१सचिव - १अप्पर सचिव -४ सहसचिव -१३ उपसचिव -२४अवर सचिव -६९ कक्ष अधिकारी -२०८ स्वीय सहाय्यक सहाय्यक व इतर लिपिक वर्गीय कर्मचारी - ८००-----------------------------महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मनुष्यबळअध्यक्ष - १ सचिव -१सह सचिव -२उप सचिव - ७अवर सचिव -१५कक्ष अधिकारी -२५सहाय्यक कक्ष अधिकारी -९६ लिपिक -टंकलेखक -६४चतुर्थ श्रेणी कर्मचारी -२५ .... स्पर्धा परीक्षा व विभागीय परीक्षाच्या माध्यमातून भरती करणे, अधिकाऱ्यांची पदोन्नती करणे, एखाद्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याला शिक्षा करणे आदी कामे एमपीएससीला करावी लागतात. - सुधीर ठाकरे ,माजी अध्यक्ष, एमपीएससी.

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकारKeralaकेरळ