शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी निवडणुकीवर टांगती तलवार

By admin | Updated: October 14, 2015 04:08 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेची (केडीएमसी) निवडणूक तोंडावर आली असताना सत्ताधारी भाजप आणि शिवसेना ही निवडणूक स्वतंत्र लढणार, असेही चित्र स्पष्ट होत आहे.

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेची (केडीएमसी) निवडणूक तोंडावर आली असताना सत्ताधारी भाजप आणि शिवसेना ही निवडणूक स्वतंत्र लढणार, असेही चित्र स्पष्ट होत आहे. त्यात सरकारने केडीएमसीच्या हद्दीतील २७ गावे वगळण्याच्या प्रक्रियेला वेग दिला. गावे स्वतंत्र करण्यासंदर्भात काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्यावर आलेल्या हरकती व सूचनांवर जनसुनावणी मंगळवारपासून सुरु करण्यात आली आहे. याविरुद्ध उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी २७ गावे समाविष्ट करणार की वगळणार, याबाबत भूमिका स्पष्ट न केल्याने केडीएमसीची निवडणूक निवडणूक आयोगाच्या वेळापत्राकानुसार होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे केडीएमसीच्या निवडणुकीवरच टांगती तलवार आहे.महापालिकेच्या हद्दीत २७ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने मे महिन्यात घेतला. तशी अधिसूचनाही काढली. निवडणूक आयोगाने केडीएमसीची निवडणूक जाहीर केल्यानंतर सरकारने अचानक २७ गावे महापालिकेतून वगळण्यासंदर्भात अधिसूचनेचा मसुदा जाहीर केला. त्यावर हरकती व सूचनाही मागवल्या. याच काळात सत्तेत असलेले भाजप आणि शिवसेना केडीएमसीच्या निवडणुकीसाठी काडीमोड घेत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्य सरकारने गावे वगळण्याच्या प्रक्रियेला सध्या वेग दिला आहे. जनसुनावणी घेण्यासाठी कोकणच्या विभागीय उपायुक्तांची नेमणूक करत मंगळवारपासून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वीच सरकार संबंधित २७ गावे वगळेल आणि मतदान करता येणार नाही, या भीतीने काही रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे होती.निवडणूक होईपर्यंत अधिसूचनेच्या मसुद्यावर पुढील प्रक्रिया न करता अंतिम अधिसूचना न काढण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)