शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याच्या गुप्त डावपेचांना ‘कात्रजचा घाट’! ‘ कथालेखक संजय राऊत, निर्माते-दिग्दर्शक शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 12:44 IST

Sharad Pawar: निर्माते-दिग्दर्शक शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांनी राज्यातील सत्ताकारणाच्या सीझन-३ चे कथालेखन करून राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्याच्या भाजपच्या सुरू असलेल्या डावपेचांना छेद दिल्याचे मानले जात आहे. 

- सुनील चावके नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतीक्षित निकाल येण्यापूर्वी निर्माते-दिग्दर्शक शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांनी राज्यातील सत्ताकारणाच्या सीझन-३ चे कथालेखन करून राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्याच्या भाजपच्या सुरू असलेल्या डावपेचांना छेद दिल्याचे मानले जात आहे. 

साडेतीन वर्षांपूर्वी नोव्हेंबर, २०१९ मध्ये राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या तोंडचा घास पळवून महाविकास आघाडीची सत्ता आणताना शरद पवार आणि संजय राऊत यांनी राज्यातील कुरघोडीच्या राजकारणाचे सीझन-१ चे नाट्यमय सादरीकरण केले होते. अडीच वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने जून, २०२२ मध्ये सीझन-२चे कथानक लिहून कुणाच्या ध्यानिमनी नसताना, मविआची सत्ता उलथवून टाकणारे कथानक लिहून प्रत्यक्षात साकारले, पण पक्षांतरबंदी कायद्याची किनार लाभलेला राज्यातील सत्तांतराचा निकाल सर्वोच्च न्यायालयात राखून ठेवल्यामुळे भाजप-शिवसेना आघाडीत कमालीची अस्वस्थता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्यापूर्वी राज्यातील सत्ता शाबूत राखण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी, तसेच लोकसभेतील ४२ जागांचे संख्याबळ कायम राखण्यासाठी भाजप गुंतला आहे. त्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या तीन डझन आमदारांना लक्ष्य करण्याचे भाजपकडून होत असलेले छुपे प्रयत्न शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या मदतीने सीझन-३ मध्ये उघड केल्याचे मानले जात आहे. 

विधानसभा व लोकसभेतील संख्याबळ सुरक्षित करण्यासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसवर जाळे फेकण्यात गुंतला आहे. भाजपकडून पवार कुटुंबातील सदस्यांना टार्गेट केले जात आहे. ‘कोणालाही मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जायचे नाही. कोणी व्यक्तिगत निर्णय घेऊ शकतात, पण पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही,’ अशी व्यथा शरद पवार यांनी  खासगीत उद्धव ठाकरेंसमक्ष राऊत यांच्यासमोर कथितपणे बोलून दाखवली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीत राजकीय नेते म्हणून सामील होणारे संजय राऊत यांनी पत्रकार म्हणून भाजपच्या पडद्यामागच्या डावपेचांची ‘थीम’ स्तंभातून उघड केली. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राऊत यांनी सीझन-३ चे कथालेखन करून भाजपचा डाव उलटवून लावला. आज त्यावर अजित पवार यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारBJPभाजपा