"कराड-मुंडे, दिशा आणि आता कुणाल कामराची रिक्षा’’, अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार एकदाचं’’, मनसेची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:35 IST2025-03-24T15:35:23+5:302025-03-24T15:35:58+5:30
Raju Patil: विविध वादविवादांमुळे राज्य विघिमंडळाचं हे अधिवेश विधायक कामकाजापेक्षा वादविवादांमुळेच अधिकच चर्चेत राहिलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे.

"कराड-मुंडे, दिशा आणि आता कुणाल कामराची रिक्षा’’, अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार एकदाचं’’, मनसेची बोचरी टीका
सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेसनामध्ये कामकाचापेक्षा विविध वादविवादच अधिक चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. अधिवेशनाच्या सुरुवातील वाल्मिक कराडचं प्रकरण, मग औरंगजेबाची कबर, अचानक पुढे आलेला दिशा सालीयनचा मुद्दा आणि आज कुमार कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेलं विधान. यामुळे राज्य विघिमंडळाचं हे अधिवेश विधायक कामकाजापेक्षा वादविवादांमुळेच अधिकच चर्चेत राहिलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे.
यासंदर्भात केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये राजू पाटील म्हणाले की, कराड-मुंडे, अबू आझमी-औरंगजेब खोक्या, कबर, नागपूर, दिशा सालियन आणि आता कुमार कामराची रिक्षा. अशा प्रकारे अर्थसंकल्पावर गहन चर्चा होऊन अनेक लोकहिताचे निर्णय घेतल्यानंतर परवा हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार एकदाचे, असा टोलाही राजू पाटील यांनी लगावला.
कराड-मुंडे,अबू-औरंगजेब,खोक्या,कबर,नागपुर,दिशा व आता कुणाल कामराची रिक्षा……..
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 24, 2025
अशा प्रकारे बजेटवर गहन चर्चा होऊन अनेक लोकहिताचे निर्णय घेऊन परवा बजेट अधिवेशन संपणार एकदाचे !