राज्यात कपिल तर मुलींमध्ये मुंबईची शलाका प्रथम

By Admin | Updated: June 20, 2014 03:28 IST2014-06-20T03:28:27+5:302014-06-20T03:28:27+5:30

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला.

Kapila in the state, the first of the Mumbai Shalaka girls | राज्यात कपिल तर मुलींमध्ये मुंबईची शलाका प्रथम

राज्यात कपिल तर मुलींमध्ये मुंबईची शलाका प्रथम

>मुंबई : देशातील अभियांत्रिकी आणि इंडियन इन्स्टिटय़ूट्स ऑफ टेक्नॉलॉजीतील (आयआयटी) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. 
या परीक्षेत दिल्ली झोनमधून राजस्थानच्या चित्रंग मुरडियाने 36क्पैकी 334 गुण मिळवित अव्वल स्थान पटकाविले. अकोल्याच्या कपिल वैद्य याने जेईई मेनप्रमाणोच जेईई अॅडव्हान्स परीक्षेत 360पैकी 307 गुण मिळवत राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. तर, राज्यात मुलींमध्ये मुंबईच्या शलाका कुलकर्णी हिने 281 गुण मिळवत बाजी मारली आहे. नागपूरच्या रुपांशू गणवीर याने एससी प्रवर्गातून देशात पहिला क्रमांक पटकविला असून, राज्यात सर्वसाधारण गटात दुसरा क्रमांक मिळवला आहे.
 
एससी प्रवर्गातून देशात प्रथम व राज्यात सर्वसाधारण गटातून दुसरा आल्याचा खूप आनंद झाला आहे. कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घ्यायचा असून मॅथॅमॅटिक्समध्ये रिसर्च करायचा आहे, असे रुपांशू गणवीर म्हणाला.

Web Title: Kapila in the state, the first of the Mumbai Shalaka girls