कल्याण : अज्ञात व्यक्तीच्या प्राणघातक हल्ल्यात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

By Admin | Updated: September 12, 2016 08:41 IST2016-09-12T08:41:03+5:302016-09-12T08:41:46+5:30

कल्याणमधील बेतुरकरपाडा येथे एका अज्ञात व्यक्तीने वयोवृद्ध दांपत्यावर प्राणघातक हल्ला केला असून त्यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली.

Kalyan: In the deadly attack of an unknown person, her husband dies and wife is critically injured | कल्याण : अज्ञात व्यक्तीच्या प्राणघातक हल्ल्यात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

कल्याण : अज्ञात व्यक्तीच्या प्राणघातक हल्ल्यात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

>ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. १२ -  कल्याणमधील बेतुरकरपाडा येथे एका अज्ञात व्यक्तीने वयोवृद्ध दांपत्यावर प्राणघातक हल्ला केला असून त्यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, लहु व जया बेतुरकर असे दांपत्याचे नाव असून ते बेतुरकरपाडा येथील घरासमोरील अंगणात झोपले असता अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये ६५ वर्षीय लहु बेतुरकर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी जया या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान या हल्ल्यात मृत्यू झालेले लहु बेतुरकर यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असल्याचे समजते. त्यामुळे हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Web Title: Kalyan: In the deadly attack of an unknown person, her husband dies and wife is critically injured