‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 05:31 IST2025-07-03T05:31:00+5:302025-07-03T05:31:48+5:30

शरद पवार गट व अजित पवार गट यांच्यातील वादात दिलेल्या या आदेशानुसार शिवसेना चिन्हावर आदेश द्यावा, अशी उद्धवसेनेची मागणी आहे. 

Just like the order regarding 'clock give the same order regarding 'bow and arrow Uddhav Sena in Supreme Court Hearing on July 14 | ‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी

‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी

नवी दिल्ली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, उद्धवसेनेने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादासंदर्भात तातडीच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी याचिका दाखल केली. न्या. एम. एम. सुंदरेश, न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा मांडण्यात आला. खंडपीठाने १४ जुलै रोजी ही याचिका सुनावणीसाठी घेण्याचे ठरविले आहे.

"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरील वादात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या धर्तीवर आदेश द्या असे या याचिकेत म्हटले आहे. घड्याळ हे चिन्ह वापरण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे असे अजित पवार गटाने मराठी वृत्तपत्रांसह अन्य वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाहीर करावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०२३ मध्ये दिला. शरद पवार गट व अजित पवार गट यांच्यातील वादात दिलेल्या या आदेशानुसार शिवसेना चिन्हावर आदेश द्यावा, अशी उद्धवसेनेची मागणी आहे. 

७ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने उद्धवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. शिंदेसेनेला ‘धनुष्यबाण’ चिन्ह देण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात उद्धवसेनेने न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

त्यावेळी उद्धवसेनेच्या वकिलांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्षांनी २०२३ मध्ये केवळ विधिमंडळातील संख्याबळावर ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदेसेनेला दिले. हे घटनापीठाच्या निर्णयाच्या विरोधात आहे.

 

Web Title: Just like the order regarding 'clock give the same order regarding 'bow and arrow Uddhav Sena in Supreme Court Hearing on July 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.