शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून उडी मारून महिला पळाली!

By admin | Updated: January 25, 2015 01:44 IST

वाघाच्या कातडीच्या तस्करीतील महिला संशयित आरोपीने बडनेरा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून उडी मारुन पळ काढला.

बडनेरा (जि़ अमरावती) : वाघाच्या कातडीच्या तस्करीतील महिला संशयित आरोपीने बडनेरा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून उडी मारुन पळ काढला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तिला अकोला गुन्हे अन्वेषण शाखा व बडनेरा रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले.मिनार निराफल चौहाण (३८,रा. राजौरी जि.दमोह,मध्यप्रदेश) असे तिचे नाव आहे. तिच्याविरुध्द नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत एक वर्षापासून गुन्हा दाखल आहे. वाघाच्या कातडी तस्करी प्रकरणात ती मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तिला अकोल्याच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. २३ जानेवारी रोजी नागपूरच्या महिला पोलीस समुन भगत व फरजाना शेख या मिनार हिला नागपूरला पेशीसाठी घेवून गेल्या होत्या. ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून अकोल्याकडे परतत असताना तिने बडनेरा स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून उडी मारुन पळ काढला. यची माहिती पोलीस विभागाने वायरलेसवरून आसपासच्या सर्व जिल्ह्णातील पोलीस ठाण्यांत दिली होती. त्यानुसार अकोला गुन्हे अन्वेषण शाखेने तिचा शोध घेतला असता ती शनिवारी पहाटे ७ वाजताच्या दरम्यान बडनेऱ्यातच आढळून आली. गाडीतून उडी मारताना तिच्या डोक्याला जखम झाली आहे. सध्या तिला अकोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी महिलेविरुध्द बडनेरा रेल्वे पोलिसांनी भादंविच्या २२४ कलामानुसार गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)