निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 02:08 PM2019-08-20T14:08:16+5:302019-08-20T14:13:33+5:30

निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी आज कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ घेतली. निपाणी मतदार संघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करताना त्यांना भाजपाने मोठी संधी दिली आहे.

Jollene takes oath as minister to Nipani MLA Shashik | निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री

निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री

googlenewsNext
ठळक मुद्देनिपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीमहिला व बालकल्याण खाते मिळणार

दादा जनवाडे

निपाणी : निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी आज कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ घेतली. निपाणी मतदार संघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करताना त्यांना भाजपाने मोठी संधी दिली आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पहिल्या यादीत त्यांनी शपथ घेतली. एकूण १७ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. जोल्ले यांच्यारूपाने निपाणी तालुक्याला पहिल्यांदा मंत्रिपद मिळाले आहे.

२००८ साली पराभव झाल्यानंतर २०१३ साली त्यांनी विजय मिळवत निपाणी मतदा संघात पहिल्या महिला आमदार म्हणून मान मिळवला. यानंतर सलग ५ वर्षे मतदार संघात मोठ्याप्रमाणात विकासकामे केली. पक्ष वाढीसाठीही त्यांनी मोठे काम केले. यामुळेच त्यांना पहिल्या टप्यात मंत्रिपद मिळाले आहे.  

खातेवाटप झाले नसले तरी महिला व बालकल्याण खाते त्यांना मिळू शकते. मुख्यमंत्री बी.एस.येडीयुराप्पा यांनी जोल्ले यांना त्यांच्या मंत्रीमंडळात स्थान दिले आहे. 
 

Web Title: Jollene takes oath as minister to Nipani MLA Shashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.