शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांची थट्टा

By admin | Updated: March 9, 2015 05:42 IST

आधी गारपीट आणि नंतर दुष्काळ, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांची राज्य सरकारने अक्षरश: फसवणूक केली आहे

सुनील कच्छवे, औरंगाबादआधी गारपीट आणि नंतर दुष्काळ, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांची राज्य सरकारने अक्षरश: फसवणूक केली आहे. सलग दुसऱ्यांदा आपत्ती ओढवल्यास बहुभूधारक शेतकऱ्यांनाही दोन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत द्यावी, असे केंद्राचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, सरकारकडून या निर्देशांची पायमल्ली करीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दोनऐवजी एक हेक्टरपर्यंतच मदत दिली जात आहे. संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील इतर काही जिल्ह्यांतही यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. यातील बहुतेक भागांत २०१४मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले. त्या पॅकेजचे सध्या वाटप सुरू आहे. या पॅकेजनुसार अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या पूर्ण क्षेत्रापुरती मदत दिली जात आहे. तर पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या बहुभूधारक शेतकऱ्यांना केवळ एक हेक्टरपर्यंतच मदत दिली आहे. परिणामी, आधी गारपीट आणि नंतर दुष्काळ यामुळे रब्बी आणि खरीप, अशी दोन्ही पिके गमावलेले मोठे शेतकरी अडचणीत आले आहेत. सलग दुसऱ्यांदा आपत्ती ओढवल्यास वैयक्तिक आर्थिक मदत देताना मोठ्या शेतकऱ्यांनाही दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जावी, असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नियम आहेत. केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१३मध्ये सर्व राज्य सरकारांच्या मुख्य सचिवांना लेखी स्वरूपात ही नियमावली पाठविलेली आहे. परंतु तरीही फडणवीस सरकारने दुष्काळी मदत देताना हे नियम पायदळी तुडविले आहेत.