अजित पवार-अमोल कोल्हे वादात जितेंद्र आव्हाडांची उडी; "दमदाटी करून घाबरवणे हा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 09:52 AM2023-12-27T09:52:47+5:302023-12-27T09:54:08+5:30

जर यमाला घाबरत नाही तर बाकीच्यांना का घाबरायचे? असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला.

Jitendra Awhad's criticism on Ajit Pawar over his criticism of Amol Kolhe | अजित पवार-अमोल कोल्हे वादात जितेंद्र आव्हाडांची उडी; "दमदाटी करून घाबरवणे हा..."

अजित पवार-अमोल कोल्हे वादात जितेंद्र आव्हाडांची उडी; "दमदाटी करून घाबरवणे हा..."

मुंबई - शिरूर लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात वादंग सुरू आहे. त्यात जितेंद्र आव्हाडांनी उडी घेत दमदाटी करणं हा अजितदादांचा स्वभाव दोष असून प्रत्येकाला घाबरवणे हे कोणालाही शक्य होत नाही अशा शब्दात टोला लगावला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, दमदाटी करणे हा अजितदादांचा स्वभाव दोष आहे. मी शरद पवारांच्या राजीनाम्याच्या दिवशी बघत होतो, हे गप्प बस, उठू नकोस...असं चालत नाही. तुम्ही घरी नाही, सार्वजनिक जीवनात आहे. प्रत्येकाला हृदयात मानसन्मान असतो. जेव्हा टीव्ही चालू असताना तेव्हा मला म्हणाले, ये गप रे...माझी मुलगी, पत्नी, नातेवाईक बघत असतील तर काय या जितेंद्रची इज्जत आहे असा प्रश्न निर्माण होतो. मी त्यांच्यापासून लांबच राहायचो. तुला पाडून दाखवतो असं जमत नाही. ती मोठी माणसं आहेत, कुणालाही पाडू शकतात, ४८ च्या ४८ जागा निवडून आणू शकतात.मोठी माणसं आहेत. विरोधकांना काय खुपतं आणि ते भाजपासोबत गेले हे त्यांचे त्यांनाच माहिती आहे. दुसऱ्याचे मन ओळखता येत नाही. मी भविष्यकर्ता नाही. प्रत्येकाला घाबरवणे हे कोणालाही शक्य होत नाही. या जगामध्ये माणूस यमाला घाबरत नाही. तो कधी ना कधी येणारच आहे ना..जर यमाला घाबरत नाही तर बाकीच्यांना का घाबरायचे? असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला. 

तर निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. त्यांच्या निर्णयाविषयी बोलणं चुकीचे आहे. सुनावणीवेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला आमच्या निकालावर भाकीत वर्तवू नका असं बजावलं होते. परंतु सुनील तटकरे हे घड्याळ चिन्ह आम्हालाच मिळणार असं विधान करतायेत. निवडणूक आयोगाचा निर्णय कधीही येऊ शकतो अशावेळी हे विधान केले जातंय. त्यातून एकप्रकारे निवडणूक आयोगावर दबाव टाकण्याचा ते प्रयत्न करतायेत असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादा गटावर केला आहे. सोबतच लढायचं तर कमळावरच..भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गटाला घरचा रस्ता दाखवतील. वेळ आल्यावर सगळे समोर येईल असंही आव्हाडांनी म्हटलं. 

प्रभू श्रीरामाचा निवडणुकीसाठी वापर

प्रभू श्रीराम हे भाजपाचा निवडणुकीच्या ३ महिन्यातील बाजारच असतो. धार्मिक बाजार मांडून देशाचे वातावरण खराब करायचं आणि निवडणूक लढायची हे भाजपाचे धोरण आजचे नाही तर वर्षोनुवर्षाचे आहे. आजच्या तरुणपिढीला हे चालत नाही. बाहेरच्या देशातील परिस्थिती बघून आपल्या देशात काय सुरू आहे हा प्रश्न त्यांना पडतो अशा शब्दात आव्हाडांनी भाजपावर आरोप केले. 

दरम्यान, मी ज्या काँग्रेसला ओळखतो तो पक्ष नाही तर चळवळ आहे. काँग्रेसची विचारसरणी आहे. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य दिले, देशाची विचारधारा निर्माण केली, अहिंसेने मार्ग काढता येतो. अहिंसेनेच ब्रिटीशांना पराभूत केले. गांधींची विचारधाराच काँग्रेसची विचारधारा आहे असं आव्हाडांनी म्हटलं आहे. 

Web Title: Jitendra Awhad's criticism on Ajit Pawar over his criticism of Amol Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.