शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Jitendra Awhad, Ajit Pawar: "चार दिवस सासूचे, तसेच चार दिवस सुनेचे असतात, प्रत्येकाने लक्षात ठेवा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 15:45 IST

आव्हाड प्रकरणाबद्दल बोलताना अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

Ajit Pawar, Jitendra Awhad: ठाणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड गेले असताना त्यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. आव्हाड गर्दीतून वाट काढत पुढे जात होते, त्यावेळी ती महिला समोर येताच आव्हाडांनी त्या महिलेला हाताने बाजूला केले आणि ते पुढे जात राहिले. मात्र, आव्हाड यांनी दोन्ही हातांनी धरून मला पुरूषांची गर्दी असलेल्या ठिकाणी ढकलल्याचा आरोप त्या तक्रारदार महिलेने केला आहे. या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांच्या बचावासाठी विविध प्रतिक्रिया देत आहेत. याचदरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला सूचक इशारा दिला आहे.

तक्रारदार महिलेनं नेमकं काय म्हटलं?

"तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. आम्ही कार्यक्रमासाठी उपस्थित होतो आणि प्रचंड गर्दी होती. त्यामुळे गर्दीचा अंदाज घेऊनच आम्ही सहजपणे मुख्यमंत्र्यांना भेटता यावं यासाठी कारच्या जवळ एका रांगेतून पुढे जात होतो. त्यात तुम्ही आमच्या पुढे श्रीकांत शिंदे यांनाही पाहू शकता. माझे मुख्यमंत्र्यांच्या पीए सोबतही त्यांच्या भेटीसाठी बोलणं झालं होतं. त्यासाठी आम्ही कारच्या कडेने पुढे जात होतो. पण त्यावेळी समोरून स्थानिक आमदार आले. आता ते आमदार असल्यानं मी त्यांना पाहून स्माइल केलं. पण त्यांनी तू इथं काय करतेस असं म्हणत मला दोन्ही हातांनी पकडून ढकललं. जिथं पुरुषांची गर्दी होती त्या ठिकाणी मला ढकललं गेलं. धक्का लागणं आणि धक्का देणं यात फरक आहे," अशा शब्दांत तक्रारदार महिलेने आपली बाजू मांडली.

अजित पवारांकडून आव्हाडांची पाठराखण आणि राज्य सरकारला इशारा

"लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड प्रकार असून सरकारने हा गुन्हा मागे घ्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठीत म्हण आहे 'चार दिवस सासूचे तसेच चार दिवस सुनेचे' असतात ही पण गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या," असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

""सरकारने लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे हे न पहाता जर कुणी कायदा हाती घेतला...चूक केली... नियमाप्रमाणे वागले नाही तर जरूर कारवाई करावी. मात्र कुणीतरी कारण नसताना नवीन जे कायदे - नियम केले आहेत त्याचा आधार घेऊन लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे, जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत असेल तर याकडे जनतेने जागरुकतेने पाहावे. तसेच या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशाप्रकारचे वातावरण करून जे महत्त्वाचे विषय आहेत त्याला बगल देण्याचे काम होते हे महाराष्ट्राला मारक आहे," असेही अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAjit Pawarअजित पवारMolestationविनयभंगEknath Shindeएकनाथ शिंदेPoliceपोलिसmumbra-kalwa-acमुंब्रा कळवा