शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जितेंद्र आव्हाड यांच्या नावे बनावट FB खातं, अभिनेत्रीसह अनेकांना पाठवलेे अश्लिल मॅसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 23:25 IST

ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर बनावट खाते उघडून एका मराठी अभिनेत्रीसह अनेकांना अश्लिल मॅसेज केले आहे.

मुंबई, दि. 15 - ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर बनावट खाते उघडून एका मराठी अभिनेत्रीसह अनेकांना अश्लिल मॅसेज केले आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिस आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केली नाही. पोलिसांनी बनावट फेसबुक खाते उघडून त्याचा चुकीचा वापर करणा-यांचा शोध आणि तपास सुरु केला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी याबाबत सांगितले की, माझ्या नावाने अज्ञात व्यक्तीने फेसबुक खाते उघडले होते. ते खाते कधीपासून कार्यरत आहे याची माहिती मला माहित नाही. मात्र, नुकतेच त्या खात्यावरून एका मराठी अभिनेत्रीला अश्लिल चॅटिंगसह मॅसेज पाठवले गेले. त्यानंतर संबंधित अभिनेत्रीने एका मित्राद्वारे याबाबत माझ्याकडे विचारणा केली. मात्र, आपण असे कोणतेही मॅसेज केले नाहीत याची माहिती दिली. यानंतर संबंधित फेसबुक खाते तपासण्यास सांगितले असता ते खाते बनावट निघाले.

यानंतर, जितेंद्र आव्हानांनी बनावट फेसबुक खाते तयार करून त्याचा चुकीचा वापर केल्याच्या विरोधात अज्ञाताविरोधात ठाणे पोलिसांत तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. हे प्रकरण सायबर क्राईमशी संबंधित असून, हे खाते कोणी, कधी व कोणत्या आयपी अ‍ॅड्रेसवरून बनवला याचा शोध घ्यावा लागेल असे सांगितले. हे प्रकरण सायबर क्राईम विभागाकडे सोपविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे.

फेसबूकवर आव्हाड यांना अश्लिल शिविगाळफेसबूक पेजवर आ. जितेंद्र आव्हाड यांना अश्लिल शिविगाळ करणा-या विक्रोळी येथील युवकाविरूद्ध नौपाडा पोलिसांकडे शुक्रवारी तक्रार देण्यात आली. देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षततेची भावना बळावत असल्याचे प्रतिपादन हमीद अन्सारी यांनी उपराष्ट्रपती पदाची कारकिर्द संपल्यानंतर केले होते. कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या वक्तव्याचे समर्थन करणारी प्रतिक्रिया एका मराठी वृत्तवाहिनीला दिली होती. वृत्तवाहिनीने आव्हाड यांची प्रतिक्रीया स्वत:च्या फेसबूक पेजवरही प्रसिद्ध केली. आव्हाड यांच्या या प्रतिक्रियेचे संमिश्र पडसाद उमटले. विक्रोळी येथील साईनाथ पाटील (वय २४) याने प्रतिक्रीया व्यक्त करताना आव्हाड यांना अश्लिल शिविगाळ करून धमकीही दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाण्याचे अध्यक्ष अभिजीत पवार यांनी शुक्रवारी रात्री यासंदर्भात नौपाडा पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवून युवकाला चौकशीसाठी ठाण्यात बोलविले होते.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेFacebookफेसबुक