जेईईत रोवला अकोलेकरांनी झेंडा!

By Admin | Updated: June 20, 2014 00:55 IST2014-06-20T00:39:26+5:302014-06-20T00:55:44+5:30

कपिल एकनाथ वैद्यने देशातून १३ वा तर राज्यातून प्रथम

JEI Rowla Akolekar flag! | जेईईत रोवला अकोलेकरांनी झेंडा!

जेईईत रोवला अकोलेकरांनी झेंडा!

अकोला : देशभरातील १६ तंत्रज्ञान संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी घेण्यात आलेल्या जेईई अँडव्हांस परीक्षेत अकोल्याच्या कपिल एकनाथ वैद्यने देशातून १३ वा तर राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
कपिलने एनटीएस परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून स्कॉलरशिपदेखील मिळविली होती. तर आठव्या, नवव्या व दहाव्या वर्गात शिकत असताना राज्य स्तरावर घेण्यात आलेल्या एमटीएसच्या परीक्षेत अनुक्रमे दुसरे, चौथे व दुसरे स्थान मिळविले होते. त्याचे वडील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शास्त्रज्ञ आहेत.

Web Title: JEI Rowla Akolekar flag!