Maharashtra Politics : 'योग्य वेळ, योग्य निर्णय! जयंत पाटील लवकरच सरकारमध्ये येतील'; राष्ट्रवादीमधील नेत्याने सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:33 IST2024-12-16T12:31:58+5:302024-12-16T12:33:09+5:30

Maharashtra Politics : काल महायुती सरकारमधील ३९ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

Jayant Patil will soon join the government NCP leader Amol Mitkari reveals everything | Maharashtra Politics : 'योग्य वेळ, योग्य निर्णय! जयंत पाटील लवकरच सरकारमध्ये येतील'; राष्ट्रवादीमधील नेत्याने सगळंच सांगितलं

Maharashtra Politics : 'योग्य वेळ, योग्य निर्णय! जयंत पाटील लवकरच सरकारमध्ये येतील'; राष्ट्रवादीमधील नेत्याने सगळंच सांगितलं

Maharashtra Politics ( Marathi News ) :   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये रविवारी एकाचवेळी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. राष्ट्रवादी कोट्यातील आणखी एक मंत्रिपद खाली ठेवल्याचे बोलले जात आहे. हे मंत्रिपद कोणत्या नेत्यासाठी याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

फडणवीसांची ऑफर नाकारल्याचा पश्चाताप होतोय; शिवसेना आमदाराची शिंदेंवर उघड नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मंत्रिपद हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी राखीव ठेवल्याचा मोठा गौप्यस्फोट आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. काही दिवसापूर्वी अधिवेशनात जयंत पाटील यांनी 'योग्य वेळी, योग्य निर्णय' असं विधान केले होते. दरम्यान, आता एक मंत्रिपद राखील ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. दरम्यान, आज अमोल मिटकरी यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मंत्रिपद देताना तारांबळ होणं साहाजिक आहे.  मला वाटत नाही कोण नाराज असेल. भुजबळ साहेब मंत्रिमंडळात नसल्यामुळे काही ओबीसी कार्यकर्ते नाराज आहेत. पक्षाकडून ते लवकरच राज्यसभेवर जातील अशी माहिती माध्यमातून मिळाली. भाजपामधील सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रि‍पदाची शपथ घेता आलेली नाही, शिवसेनेतील दीपक केसरकर यांनाही शपथ घेता आली नाही. कोणही नाराज नाही, असंही मिटकरी म्हणाले. 

'जयंत पाटील लवकरच सरकारमध्ये येतील'

राखील ठेवलेल्या मंत्रिपदावरुन बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, मागेही एक मंत्रिपद जयंत पाटील यांच्यासाठी ठेवले होते त्यावेळी त्यांनी फार विचार केला. नंतर लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळालं त्यावेळी त्यांना तिथं जाण्याची गरज नाही असं वाटलं. पण आता अशी परिस्थिती आहे की एक मंत्रिपद जे खाली ठेवलंय त्याकरता योग्य व्यक्ती, योग्य निर्णय हे तेच बोललेत. त्यामुळे आता लवकरच योग्य निर्णय होईल. त्यांना अस्वस्थ होणे सहाजिकच आहे. पण ते नक्कीच येतील. डिसेंबरच्या अखेर ते नक्की येतील, असा मोठा गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी केला.

Web Title: Jayant Patil will soon join the government NCP leader Amol Mitkari reveals everything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.