"राम मंदिराच्या उभारणीत पारदर्शकता राहावी यासाठी रामभक्तांची अराजकीय समिती तयार करावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 06:14 PM2021-06-17T18:14:30+5:302021-06-17T18:16:05+5:30

Ram Mandir : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचं आवाहन. अतिशय भक्तिभावाने राममंदिर उभे व्हावे अशी देशातील रामभक्तांची इच्छा, पाटील यांचं वक्तव्य.

jayant patil on ayodhya ram mandir for transparent work neet to form non political committee | "राम मंदिराच्या उभारणीत पारदर्शकता राहावी यासाठी रामभक्तांची अराजकीय समिती तयार करावी"

"राम मंदिराच्या उभारणीत पारदर्शकता राहावी यासाठी रामभक्तांची अराजकीय समिती तयार करावी"

Next
ठळक मुद्देप्रश्नाला उत्तर देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचं आवाहन.अतिशय भक्तिभावाने राममंदिर उभे व्हावे अशी देशातील रामभक्तांची इच्छा, पाटील यांचं वक्तव्य.

"राममंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही हे बघण्यासाठी देशातील रामभक्तांनी अराजकीय अशी एक समिती तयार करावी," असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. राम मंदिरासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी हे आवाहन केलं.

"या समितीने कायम राममंदिर उभारणीतील खर्च, जमाखर्च आणि त्याचा हिशोब हा त्रयस्थ बॉडीने निरीक्षणाखाली ठेवावा कारण रामभक्तांकडे रामभक्तांची अपेक्षा आहे की, प्रामाणिकपणे मंदिराचं पावित्र्य राखून राममंदिर उभं राहावं," असेही जयंत पाटील म्हणाले. अतिशय भक्तिभावाने राममंदिर उभे व्हावे अशी या देशातील रामभक्तांची इच्छा आहे म्हणून रामभक्त मोठ्याप्रमाणावर निधी देत आहेत. मात्र राममंदिर उभारणीत गोळा होणार्‍या निधीत भ्रष्टाचार होत असेल तर हे दुदैव आहे असं म्हणत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

आर्थिक फायदे मिळवण्याचा काहींचा प्रयत्न
"राममंदिर बांधताना हे लोक भ्रष्टाचार करत असतील तर श्रीराम यांच्यापासून किती लांब आहेत आणि श्रीरामापासून हे किती लांब आहेत हे स्पष्ट होते. रामाचा फायदा घेऊन कसे वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय फायदे आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत हे यानिमित्ताने समोर आले आहे," अशी टीका जयंत पाटील यांनी यावेळी केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: jayant patil on ayodhya ram mandir for transparent work neet to form non political committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app