शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जयंत नारळीकर यांचा शाहू पुरस्काराने झाला होता सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:19 IST

नारळीकरांचे मूळ घराणे भुदरगड तालुक्यातील पाटगावचे. परंतु पूर्वज आले आणि कोल्हापुरात महाद्वार रोडवर स्थायिक झाले. या ठिकाणचा नारळीकर वाडा पाडून काही वर्षांपूर्वी या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात आले.

कोल्हापूर : येथे जन्मलेले आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी त्यांचा २००० मध्ये शाहू स्मारक ट्रस्टच्या राजर्षी शाहू पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. डॉ. नारळीकर यांच्या निधनानंतर शहरामध्ये त्यांच्या आठवणी जागविण्यात येत आहेत.नारळीकरांचे मूळ घराणे भुदरगड तालुक्यातील पाटगावचे. परंतु पूर्वज आले आणि कोल्हापुरात महाद्वार रोडवर स्थायिक झाले. या ठिकाणचा नारळीकर वाडा पाडून काही वर्षांपूर्वी या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात आले. त्यालाही ‘नारळीकर भवन’ असे नाव देण्यात आले आहे. त्यांचे आजोळही कोल्हापुरातीलच. शंकर आबाजी हुजूरबाजार हे त्यांचे आजोबा. नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी येथील दाभोळकर नर्सिंग होममध्ये झाला. परंतु त्यांचे सर्व शिक्षण बनारस विद्यापीठ आणि अन्य ठिकाणी झाले.

खगोलशास्त्रामध्ये भरीव कामगिरी करणारे डाॅ. नारळीकर यांच्या कामाची दखल घेऊन सन २००० सालचा शाहू पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला होता. यानंतर ११ नोव्हेंबर २००६ रोजी त्यांनी पाटगाव येथे पत्नी मंगला यांच्यासह भेट देऊन पूर्वजांविषयी माहिती घेतील होती. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागवण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या शाळेतील मुलांशी केशवराव भोसले नाट्यगृहात त्यांनी संवाद साधला होता. यावेळी अरुण नाईक आणि विनायक पाचलग यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली होती.  शिवाजी विद्यापीठातही त्यांची व्याख्याने झाली होती.

टॅग्स :Jayant Narlikarजयंत नारळीकरkolhapurकोल्हापूर