“पुढील ५ वर्षांच्या काळात अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर चांगलेच होईल”: जय पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 16:12 IST2024-12-09T16:11:54+5:302024-12-09T16:12:52+5:30

Jay Ajit Pawar News: पुढील विधानसभेला आमदारकीसाठी निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर जय पवार यांनी सूचक विधान करत आपली भूमिका स्पष्ट केली.

jay pawar said it would be good if ajit pawar gets chief minister post in next 5 years | “पुढील ५ वर्षांच्या काळात अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर चांगलेच होईल”: जय पवार

“पुढील ५ वर्षांच्या काळात अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर चांगलेच होईल”: जय पवार

Jay Ajit Pawar News: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. तर दुसरीकडे बारामतीतअजित पवार यांचा एक मोठा कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी माहिती देताना अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत आशा असल्याचे सूतोवाच केले.

जय पवार म्हणाले की, सर्व बारामतीकरांचे, मतदारांचे आभार मानतो. गावागावांत जाऊन आभार मानले जाणार आहेत. तसेच गावकऱ्यांच्या काय समस्या असतील, आचारसंहितेत कामे झाली नसतील, तर ते समजून घेऊन ती कामे पूर्ण करायची आहेत. अजित पवार यांचा नागरी सन्मान करण्यात येणार असून, त्याचे नियोजन पार्थ पवार पाहत आहेत, अशी माहिती जय पवार यांनी दिली. 

पुढील ५ वर्षांच्या काळात अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर चांगलेच होईल

आमच्या सगळ्यांची आशा अजित पवार मुख्यमंत्री होतील किंवा व्हावेत, अशीच आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सर्वाधिक स्ट्राइक रेट होता. आमचा दुसरा होता आणि शिवसेनेचा तिसरा होता. त्यामुळे सगळ्याच महायुतीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पुढील पाच वर्षांच्या काळात अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळाली तर चांगलेच होईल, असे सूतोवाच जय पवार यांनी केले.

दरम्यान, १४ तारखेला अजितदादांचा कार्यक्रम आहे. त्यावेळेस ते काही गोष्टी सांगतील. त्यांच्या मनात काय आहे, ते बोलून दाखवतील. मी बारातमीकरांसाठी कायम इथे असणार आहे. भविष्यातील निवडणुकांसाठी सर्वांना सहकार्य करणार आहे. नवीन चेहरे खूप आहेत. नवीन चेहऱ्यांना संधी मिळायला हवी. स्थानिक संस्थानच्या निवडणुकांची तयारी आता सुरू होत आहे. पुढील विधानसभेला आमदार होण्याचे स्वप्न नाही. आमचा पक्ष आम्हाला देशभरात वाढवायचा आहे. पार्थ पवार आणि मी त्यासाठी काम करणार आहोत. त्यादृष्टीने वाटचाल करणार आहोत, असे जय पवार यांनी नमूद केले. 
 

Web Title: jay pawar said it would be good if ajit pawar gets chief minister post in next 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.