शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: महायुती संक्रातीच्या पूर्वसंध्येला फुंकणार लोकसभेचे रणशिंग, तिन्ही पक्षात समन्वय राखणार

By सुनील पाटील | Updated: January 11, 2024 16:15 IST

Jalgaon Mahayuti News: महायुतीत समन्वय असावा, वाद-विवाद, मतभेद असू नये यासाठी भाजप, शिंदे गट व अजित पवार गट या तीनही पक्षांचा १४ जानेवारी रोजी अर्थात मकरसंक्रातीच्या पूर्वसंध्येला एकाच दिवशी राज्यभर महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. याच मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले जाणार आहे.

- सुनील पाटील जळगाव - महायुतीत समन्वय असावा, वाद-विवाद, मतभेद असू नये यासाठी भाजप, शिंदे गट व अजित पवार गट या तीनही पक्षांचा १४ जानेवारी रोजी अर्थात मकरसंक्रातीच्या पूर्वसंध्येला एकाच दिवशी राज्यभर महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. याच मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले जाणार आहे. समन्वयातूनच महायुती उमेदवार जाहिर करेल अशी माहिती शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख नीलेश पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

पद‌्मालय शासकीय विश्रामगृहावर झालेल्या या पत्रकार परिषदेला आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, अजित पवार गटाचे रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शिंदे गटाच्या सरिता माळी-कोल्हे आदी उपस्थित होते. १४ जानेवारी रोजी लाडवंजारी मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांच्यासह खासदार, आमदार व तीनही पक्षांचे जिल्हाध्यक्ष, समन्वयक उपस्थित राहणार आहेत.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या तिन्ही मित्र पक्षांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली महामेळावे होत आहेत. १५ मित्र पक्ष सहभागी होतीलराज्याच्या धर्तीवर शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट यांचा जळगाव जिल्ह्यात देखील समन्वय राहिला पाहिजे, त्यादृष्टीकोनातून तिन्ही पक्षांसह १५ मित्र पक्षांचा मेळावा होणार आहे. त्यानंतर प्रत्येक तालुकास्तरावर तिन्ही पक्षांसह आपले मित्र पक्ष आपआपल्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करतील.

जिल्हास्तरावर भाजपचे आमदार मंगेश चव्हाण, शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील, अजित पवार गटाचे संजय पवार यांची समन्वय समिती स्थापन झालेली असून त्यांनी तिन्ही पक्षाची भूमिका समजून घेतल्यानंतर वरिष्ठ नेते त्यावर निर्णय घेतील. महायुतीमध्ये प्रत्येक पक्षाला मत मांडण्याचा अधिकार आहे. दावा करणे गैर नाही. महायुती ठरवेल तोच उमेदवार निश्‍चित होईल. त्याला मित्र पक्ष पाठिंबा देवून निवडून आणेल. विरोधकांनी पसरविलेला गैरसमज देखील दूर होईल, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :JalgaonजळगावBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार