शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूरचा झटका कोणाला?

By admin | Updated: October 8, 2014 23:03 IST

राजापूर मतदार संघ : प्रकल्पग्रस्त कोणाच्या बाजूने झुकणार हा प्रश्नच

राजापूर : प्रखर विरोधानंतर केंद्रात सत्ता आल्यानंतरदेखील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात सेनेला आलेले अपयश, भाजपने त्या प्रकल्पाचे केलेले जाहीर समर्थन, समस्त मच्छीमारांच्या प्रकल्पविरोधी तीव्र भावना असतानादेखील त्यांचे नेते अमजद बोरकर यांनी केलेला भाजप प्रवेश तर आपली मूळ भूमिका कशी योग्य होती ते ठासून सांगण्याचा प्रयत्न करणारी काँग्रेस व राष्ट्रवादी, यामुळे देवाचे गोठणे व सागवे जिल्हा परिषद गटातील मतदार राजा यावेळी कुणाच्या पारड्यात मतदान करणार याला महत्व आले आहे.देशातील सर्वात मोठा १० हजार मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प जैतापूर परिसरात आला असून या प्रकल्पामुळे परिसरातील बागायती, शेती, मच्छीमारीवर विपरीत परिणाम होवून ती नष्ट होतील. या भीतीस्तव स्थानिक जनता मागील काही वर्षे कडाडून संघर्ष करत असून शिवसेनेने याच मुद्द्यावर रान पेटवत अनेक आंदोलन उभारली. त्यामुळे तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद गट सेनेच्या पाठीशी राहिले. त्या बळावर सेनेने अनेक निवडणुकीत बाजी मारत विरोधकांना पराभूत केले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांना या दोन्ही विभागांनी दणदणीत मताधिक्य दिले. मात्र त्यानंतर चार महिन्याचा कालावधी लोटला तरी शिवसेनेला केंद्रात सत्ता मिळूनही जैतापूर प्रकल्प रद्द करता आलेला नाही, हे वास्तव अधोरेखित ठरले आहे. राज्यात सेना भाजप युती तुटली असली तरी केंद्रातील सत्तेतून शिवसेना अद्याप बाहेर पडलेली नाही आणि प्रकल्पदेखील रद्द झालेला नाही. त्यामुळे इथले मतदार सेनेवर आणखी एक विश्वास दाखवतात का? हा महत्वाचा मुद्दा आहे.शिवसेनेने आजही प्रकल्प रद्द व्हावा, अशी भूमिका घेतली असतानाच सेनेचा मित्रपक्ष राहिलेल्या भाजपने मात्र केंद्रात सत्ता येताच जैतापूर प्रकल्पाचे समर्थन केल्यामुळे स्वतंत्रपणे लढणाऱ्या भाजपच्या उमेदवाराच्या पाठी इथला मतदार किती रहातो, हे निकालात स्पष्ट होईल. भाजपच्या भूमिकेबाबत मच्छीमारांना काय वाटते, हे १९ आॅक्टोबरला भाजप उमेदवाराला मिळणाऱ्या मतांवरुन स्पष्ट होणार आहे.युतीमधील सुंदोपसुंदीच्या पार्श्वभूमीवर जैतापुरात प्रकल्प आणणारी काँग्रेस व राष्ट्रवादी मात्र आपली त्यावेळची भूमिका कशी योग्य होती व सेनेने प्रकल्पग्रस्तांना कसे फसवले, ते आता ठासून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर इथला मतदार कोणती भूमिका घेतो त्यावरच प्रत्येक उमेदवाराला मिळणारी मते व विजयाकडे वाटचाल करताना लागणारे मताधिक्य यांची गणिते ठरणार आहेत. (प्रतिनिधी)भाजपचे प्रकल्पाला समर्थन असतानादेखील साखरीनाटेतील मच्छीमार नेते अमजद बोरकर यांनी रत्नागिरीतील भाजपच्या जाहीर प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यामुळे प्रेरित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जैतापूर प्रकल्पाला कडाडून विरोध करणाऱ्या मच्छीमार बांधवांचे नेतृत्व हे बोरकर करतात. केंद्र सरकार प्रकल्पाला समर्थन देत असतानादेखील बोरकर यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.