शहरं
Join us  
Trending Stories
1
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
2
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
3
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
4
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
5
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
6
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
7
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
8
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
9
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
10
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
11
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
12
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
13
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
14
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
15
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
16
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
17
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
18
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
19
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
20
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
Daily Top 2Weekly Top 5

सगळेच सुरू मग आता लग्नातील पंगतीवरच निर्बंध का? थेट सवाल तोही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 15:24 IST

मद्याविक्री आधीच सुरू केली, आता हॉटेल्स आणि बारही सुरु केले..

ठळक मुद्देकेटरिंग असोसिएशनचा सवाल: सरकारी निर्णयातील विसंगतीचांगला रोजगार निर्माण करणारा हा व्यवसाय मोडून पडला असल्याची तक्रार आठ लाखांपेक्षा अधिक लोकांचा तब्बल सहा महिने बुडाला रोजगार

पुणे: मद्याविक्री आधीच सुरू केली, आता हॉटेल्स आणि बारही सुरु केले, लग्नकार्यातील उपस्थितीवरच निर्बंध कशासाठी? हा सवाल विचारला आहे लग्नातील पंगतीवर व्यवसाय अवलंबून असणाऱ्या केटरिंग चालकांनी! तोही थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच! 

महाराष्ट्र केटरिंग असोसिएशने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवून सरकारी निर्णयातील विसंगतीकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. मिशन बिगीन अंतर्गत अनेक गोष्टी सुरू झाल्या, मात्र लग्नकार्यातील ५० जणांच्या उपस्थितीवरचे निर्बंध आहे तसेच आहेत. त्याचा थेट परिणाम केटरिंग चालकांवर झाला आहे. जेवणावळीच होत नसल्याने त्यांच्या हाताला पुरेसे कामच राहिलेले नाही. मार्च ते जूलै २०२० या काळात फक्त लग्नाचे ६० मुहूर्त होते, त्याशिवाय अन्य कार्यक्रम. या सगळ्यातील परिस्थिती केवळ ५० होती. त्यामुळे एरवी चांगला रोजगार निर्माण करणारा हा व्यवसाय मोडून पडला असल्याची तक्रार असोसिएशनने केली आहे.या एका निर्बंधामुळे फक्त केटरिंगच नाही तर मंगलकार्यालयांपासून ते भटजी, फोटोग्राफर्स, व्हिडीओ चित्रीकरण करणारे, वाढपी, लहान मुलांची खेळणी तयार करणारे असे एकूण ५० व्यवसाय व त्यावर अवलंबून असणाऱ्या आठ लाखांपेक्षा अधिक लोकांचा तब्बल सहा महिने रोजगार बुडाला. त्यातील अनेक व्यावसायिकांनी सिझन लक्षात घेऊन कर्ज काढले होते, ते फेडता येत नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली. ते संघटीत नसल्याने सरकारकडून त्यांना एका पैशाचीही मदत होत नाही असे असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी सांगितले.एसटी बसला पुर्ण क्षमतेने, हॉटेल, बारला ५० टक्के ऊपस्थितीने परवानगी दिली, मग लग्नकार्यांनीच सरकारचे काय घोडे मारले आहे असे सरपोतदार म्हणाले. कोरोना संकट सर्वांवरच आले आहे, मात्र त्यातून मार्ग काढला जात आहे, तसाच मार्ग लग्नकार्यातील ऊपस्थितीची अट ५० ऐवजी किमान २०० करून काढावा अशी मागणी असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारfoodअन्नmarriageलग्न