शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

महाविकास आघाडीत पुन्हा मतभेद; मंत्री सांगतात एक, तर मुख्यमंत्र्यांचा वेगळाच दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 12:45 PM

मुस्लिम आरक्षणावरुन मंत्री नवाब मलिक आणि मुख्यमंत्री ठाकरेंचा वेगवेगळा दावा

ठळक मुद्देमुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारमध्ये मतभेदमुख्यमंत्री ठाकरे आणि मंत्री नवाब मलिक यांचा वेगवेगळा दावामुस्लिम आरक्षणाचा विषय अधिकृतपणे माझ्याकडे आला नाही- मुख्यमंत्री

मुंबई: एल्गार प्रकरण, सुधारित नागरिकत्व कायद्यापाठोपाठ आता आणखी एका विषयावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. गेल्याच आठवड्यात अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याची तयारी सुरू असल्याचं सांगितलं. याबद्दलचं विधेयक लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडलं जाईल. यानंतर या संदर्भात अध्यादेशही काढला जाईल, असंदेखील ते पुढे म्हणाले होते. मात्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत अद्याप हा विषय अधिकृतपणे आपल्याकडे आला नसल्याचा दावा केला. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांमध्ये समन्वय नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुस्लिम आरक्षणावर भाष्य केलं. 'मुस्लिम आरक्षणाचा विषय अद्याप अधिकृतपणे माझ्यापर्यंत आलेला नाही. आम्ही अद्याप याबद्दलची भूमिका निश्चित केलेली नाही,' असं मुख्यमंत्री म्हणाले. या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांनादेखील त्यांनी उत्तर दिलं. जेव्हा हा विषय चर्चेला येईल, तेव्हा विरोधकांनी टीका करावी. त्यांनी आपली ऊर्जा राखून ठेवावी, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.विधिमंडळात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीविरोधात ठराव मंजूर करणार का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला त्यांनी सावधपणे उत्तर दिलं. 'या विषयासंदर्भात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक समिती स्थापन करण्यात येईल. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीमध्ये असलेल्या तरतुदींचा आढावा या समितीकडून घेतला जाईल,' असं उद्धव यांनी सांगितलं. गेल्याच महिन्यात उद्धव यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर सुधारित नागरिकत्व कायद्याला अनुकूल भूमिका घेतली. त्यामुळे काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आज राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सावध पवित्रा घेतला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMuslimमुस्लीमreservationआरक्षण