शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातील घरकुल योजनेच्या यादीत गर्भश्रीमंतही!

By admin | Updated: March 12, 2015 00:07 IST

अजब कारभार : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या फेरसर्वेक्षणाची मागणी, ६0 टक्के लाभार्थ्यांबाबत संशय

अशोक पाटील -इस्लामपूर  शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेच्या लाभार्र्थींच्या यादीत चक्क गर्भश्रीमंतांचा समावेश आहे. या यादीतील सुमारे ६0 टक्के कुटुंबांकडे स्वत:ची घरे आहेत. त्यांच्यातील काहींचा सावकारीचा व्यवसाय आहे, तर काहीजण चारचाकीतून फिरतात! त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे फेरसर्वेक्षण व्हावे, अशी मागणी होत आहे.१९९६ मध्ये ज्या कुटुंबांचा दारिद्र्य रेषेखालील यादीत समावेश झाला आहे, त्यांनाच घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी महादेवनगर परिसरात १0८ घरकुले बांधण्यात आली आहेत. त्यांचे वाटपही करण्यात आले आहे, परंतु या घरकुलांमध्ये १0 टक्के लोकही वास्तव्यास नाहीत. या घरकुलांना अद्यापही वीज व पाण्याची सुविधा नाही. त्यांचा वापर आता अवैध व्यवसायांसाठी सुरू झाला आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही दखल घेतली गेलेली नाही. या घरकुलांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे मत व्यक्त करत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी पालिकेतील सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला होता.स्मशानभूमीनजीक बांधलेल्या ३९५ घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातील ६0 टक्के कुटुंबीय इतरत्र स्वत:च्या घरात रहात असून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. ज्यांना घरकुले देण्यात आली आहेत, त्यांच्याकडून घरकुलासाठी लागणारी रक्कम भरून घेण्यात आली आहे. मात्र यातील काही कुटुंबे पुणे, मुंबई येथे वास्तव्यास आहेत. शहरातील महत्त्वाच्या खासगी भूखंडांवर झोपड्या बांधून राहणाऱ्या कुटुंबांनाही यातील घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. पालिकेचे पदाधिकारी हे भूखंड घशात घालण्याच्या कामाला लागले असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे फेरसर्वेक्षण करून, खरोखरच ज्यांना गरज आहे, त्यांनाच या घरकुलांचे वाटप करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.विमानाने प्रवास!१९९६ मध्ये दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबांतील एकास घर मिळाले. ते सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. घरकुलाचे पैसे भरण्यासाठी त्यांनी मुंबई ते पुणे विमानाने प्रवास केल्याची चर्चा आहे.१९९६ मध्ये दारिद्र्य रेषेखाली समाविष्ट असलेल्या कुटुंबांच्या आजच्या परिस्थितीचे फेरसर्वेक्षण करावे. जेणेकरून खऱ्या लाभार्थीला त्याचा लाभ होईल. जे घरकुलासाठी पात्र नसतील, त्यांना घरकुल मिळाले, तर देणाऱ्या आणि घेणाऱ्यांविरोधात शासनाकडे तक्रार करु.- विक्रम पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा