Vaibhav Khedekar News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार २५ ऑगस्ट रोजी कोकणातील नेते वैभव खेडेकर यांना मनसेतून बडतर्फ करण्यात आले होते. यानंतर वैभव खेडेकर यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश दोन ते तीन वेळा रखडला. वैभव खेडेकर शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईतही दाखल झाले होते. परंतु, वैभव खेडेकर यांच्या पक्ष प्रवेशाला मुहूर्त काही मिळाला नाही. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश ४ सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आला होता. परंतु, राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यामुळे वैभव खेडेकर यांचा पक्ष प्रवेश पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले गेले. यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा वैभव खेडेकर यांचा भाजपातील पक्ष प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. वैभव खेडेकर शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना घेऊन मुंबईतही दाखल झाले होते. परंतु, तेव्हाही भाजपाकडून पक्ष प्रवेशाबाबत कोणतीही हालचाल झाली नाही. यामुळे वैभव खेडेकर आणि त्यांच्या समर्थकांची चलबिचल मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे प्रभाग आरक्षणामुळेही वैभव खेडेकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे.
पक्षप्रवेश रखडला, चलबिचल वाढली
कोकणातील नेते वैभव खेडेकर यांच्या डोक्यावरील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृपेचा वरदहस्त दूर झाला आणि त्यांचे राजकीय ग्रहच फिरले. शक्तिप्रदर्शन करीत भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले खरे पण त्यावेळी मुहूर्त चुकला. अद्यापही त्यांना पक्षप्रवेशासाठी बोलावणे आले नाही. पक्षप्रवेशात नेमका कुणाचा अडसर आहे हे रहस्य कायम आहे. मात्र, यामुळे चलबिचल वाढल्याने त्यांनी मुंबईत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. दुसरीकडे भाजप प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह कायम असतानाच खेडचे नगराध्यक्षपद यंदा खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने स्थानिक पातळीवरही त्यांना धक्का बसला आहे. हे ग्रहमान फिरल्याचे संकेत तर नाही ना? अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश तिसऱ्यांदा रखडला असून त्यांनी पुन्हा भाजप नेते रवींद्र चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. या भेटींनंतरही त्यांच्या प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा न झाल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे. राज ठाकरे यांच्या कृपेचा हात सुटल्यानंतर खेडेकर यांची राजकीय परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे बोलले जात आहे.
Web Summary : After expulsion from MNS, Vaibhav Khedekar's BJP entry is delayed multiple times, causing uncertainty. His supporters are restless. Local political shifts further complicate matters for the former mayor.
Web Summary : एमएनएस से निष्कासन के बाद, वैभव खेडेकर का भाजपा में प्रवेश कई बार विलंबित हुआ, जिससे अनिश्चितता हुई। उनके समर्थक बेचैन हैं। स्थानीय राजनीतिक बदलावों ने पूर्व महापौर के लिए और मुश्किलें खड़ी कर दी हैं।